घरासमोर पार्किंग केलेल्या दुचाकीची चोरी
लातूर : विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या घरासमोर पार्किंग केलेल्या एम. एच.१२ इ.क्यू. ७२४२ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत अफरोज खान पठाण (रा. कमाल नगर लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पैसे देण्याघेण्याच्या कारणावरून मारहाण
लातूर: तू कामासाठी घेतलेले पैसे परत दे असे फिर्यादी म्हणाली असतात तुमचे पैसे घेतलेले नाहीत असे म्हणतात डोक्याला धरून रोडवर आपटून डोके फोडले. तसेच शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तू माझे पैसे नाही दिले तर तुला जीवे मारू अशी धमकी दिल्याची घटना गवळीनगर येथे घडली. याबाबत संगीता शंकर चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बालाजी उर्फ भालचंद्र त्र्यंबक कोळपे व अन्य दोघांविरुद्ध विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मुरूळे करीत आहेत.
चार्जिंगला लावलेल्या मोबाईल चोरीला
लातूर: नांदेड नाका उदगीर येथील मोरे हॉस्पिटल येथील काउंटरवर चार्जिंगला लावलेल्या मोबाईलची चोरी झाल्याची घटना ८ ऑगस्ट रोजी घडली. याबाबत साईनाथ नागनाथ शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोना. रंगवाळ करीत आहेत.
अपार्टमेंटमध्ये पार्किंग केलेली दुचाकी चोरीला
लातूर: शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मी अपार्टमेंटमध्ये पार्किंग केलेल्या एम.एच. २५ बीजे ५६७३ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत गोपाळ बद्रीनारायण अग्रोया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोना. गिरी करीत आहेत.