लातूर : शहरालगत असलेल्या हरंगुळ रेल्वे स्थानक येथे एका ५५ वर्षीय पुरुषाचा रेल्वेअपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात १९ डिसेंबर राेजी आकस्मिक मृत्यूची नाेंद केली आहे. मात्र, मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसून, ती पटविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
पाेलिसांनी सांगितले, सहायक फाैजदार एस.बी. जगताप यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. जगताप हे कर्तव्यावर असताना, एका ५५ वर्षीय अनाेळखी पुरुषाचा मृत्यू रेल्वेच्या अपघातात झाल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पाेलिसांनी भेट देऊन मृतदेहाची पाहणी केली. मयत व्यक्तीच्या डाेक्यासमाेर टक्कल पडलेले आहे. डाेक्याचे केस पांढरे, दाढी पांढरी वाढलेली आहे. अंगामध्ये पांढऱ्या रंगाचा नेहरू शर्ट, पांढऱ्या रंगाचे बटन, बनियन, पांढऱ्या रंगाचे धाेतर, अंगात पिवळ्या, पांढऱ्या, राखाडी, गुलाबी रंगाच्या छटा असलेले वुलनचे स्वेटर, गळ्यामध्ये माेठ्या मण्यांची माळ, पायात ॲपेक्स कंपनीचा बूट आहे. पाेलिस या मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न करत आहेत.
मात्र, अद्यापही ओळख पटविण्यात त्यांना यश आले नाही. याबाबत अधिक माहितीसाठी एमआयडीसी पाेलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पाेलिसांनी केले आहे. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात १९ डिसेंबर राेजी आकस्मिक मृत्यूची नाेंद केली आहे.