शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

महामार्ग नव्हे मृत्यूमार्ग! लातूर-जहीराबाद महामार्गावर पुन्हा अपघातात एकाचा मृत्यू

By संदीप शिंदे | Published: November 28, 2023 6:16 PM

लातूर-जहीराबाद राष्ट्रीय महामार्गावरील निलंगा ते औराद शहाजनी, निलंगा ते केळगाव मार्गावर रस्ता झाल्यापासून सातत्याने अपघात होऊन अनेकांचा बळी गेला आहे.

निलंगा/औराद शहाजानी : निलंगा येथून औराद शहाजानीकडे येत असताना अज्ञात वाहनाने धडक देऊन दुचाकीस्वारास चिरडल्याची घटना मंगळवारी पहाटे अनसरवाडा पाटीजवळ घडली. यामध्ये दुचाकीस्वार ठार झाला असून, माधव व्यंकटराव तरुरे (वय ५२) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

औराद शहाजनी येथील माधव व्यंकटराव तुरुरे (वय ५२ रा. कोटमाळ ता. हुलसूर, कर्नाटक) हे २५ वर्षांपासून औराद बाजार समितीमध्ये मुनीम म्हणून काम करतात. सोमवारी सुट्टी असल्याने ते खासगी कामासाठी गावी गेले होते. मंगळवारी पहाटे ते दुचाकी क्रमांक एम.एच. २४ एई ७३११ ने निलंग्याकडून औराद शहाजानीकडे येत असताना अनसरवाडा पाटीजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीस धडक दिली. यात तरुरे यांचा जागीच मृत्यू झाला. निलंगा उपजिल्हा रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, औराद शहाजानी येथील बाजार समितीमध्ये माधव तरुरे मुनीम म्हणून काम करत होते. मंगळवारी त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच औराद शहाजानी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व व्यवहार बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

महामार्ग नव्हे मृत्यूमार्ग...लातूर-जहीराबाद राष्ट्रीय महामार्गावरील निलंगा ते औराद शहाजनी, निलंगा ते केळगाव मार्गावर रस्ता झाल्यापासून सातत्याने अपघात होऊन अनेकांचा बळी गेला आहे. महामार्गावर खड्डे पडले असून अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. दुचाकीची चाके भेगामध्ये अडकत असल्याने अपघात होत आहेत. त्यामुळे महामार्गावर प्रवास करणे धोक्याचे झाले आहे.

टॅग्स :laturलातूरAccidentअपघात