याप्रसंगी अरविंद पाटील निलंगेकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, निलंगा उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. साैंदळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष भारतबाई साळुंके, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार गणेश जाधव, जिल्हा परिषद सदस्य कुसुमताई हालसे, पंचायत समिती उपसभापती अंजली पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीनिवास कदम, भाजप तालुकाध्यक्ष शाहुराज थेटे, माजी सरपंच माेहनराव भंडारे, शहराध्यक्ष राजा पाटील, डाॅ. मल्लिकार्जुन शंकद, तंटामुक्तीचे अध्यक्ष बाबुराव भंडारे, ग्रामपंचायत सदस्य शिवपुत्र आगरे, रज्जाक रक्साळे, व्यंकट गिरी, बालाजी भंडारे उपस्थित होते.
कोरोना संसर्गाची सध्याची स्थिती आणि संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीसाठी निलंगा तालुक्यात अधिकच्या ऑक्सिजन खाटांची व्यवस्था करण्याच्या उद्देशाने औराद येथे ऑक्सिजनयुक्त ३० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी मागील आठ दिवसांपासून अरविंद पाटील निलंगेकर यांनी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीची पाहणी करून वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली होती. तसेच तत्काळ आवश्यक साहित्य, औषधे व इतर बाबींची पूर्तता करून घेऊन जलदगतीने हे कोविड हॉस्पिटल सुरू केले.
यावेळी माजी मंत्री, आ. संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, कोविड सेंटर सुरू होणे हे अभिमानास्पद नसून लवकरात लवकर हे कोविड सेंटर बंद करण्याचा आणि औरादमध्ये कोविडने एकही मृत्यू होणार नाही, असा संकल्प औरादकरांनी करण्याचे आवाहन केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर कदम, डॉ. वैभव कांबळे व आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालयासाठी आवश्यक इतर साहित्यही उपलब्ध करून देऊन लवकरच ते पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची सूचना त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना केली.
ग्रामपंचायतीकडून वॉटर फिल्टर...
ग्रामीण रुग्णालयात सुरू केलेल्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलसाठी दाेन तज्ज्ञ डॉक्टर, दोन कंत्राटी डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच दोन वैद्यकीय अधिकारी, उपकेंद्रांचे चार डॉक्टर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. रुग्णालयातील रुग्णांना पिण्यासाठी शुध्द पाणी मिळावे म्हणून ग्रामपंचायतीने तीन लाखाचे वॉटर फिल्टर उपलब्ध करून दिले. येथील व्यापारी संघटनेने टीव्ही संच भेट दिले.