शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाग्यश्री आत्राम अहेरीत पराभूत होतील"; शरद पवारांच्या उमेदवाराला काँग्रेसचाच विरोध
2
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
3
"कुठे गेले ते १५ मिनिटवाले...?"; आमदार नितेश राणेंचा ओवैसींवर हल्लाबोल
4
Success Story: ८००० रुपये कर्ज घेऊन सुरू केलं काम; आज ८०० कोटींच्या मालकिण, कपड्यांचा आहे मोठा ब्रँड
5
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
6
आधी संसदेत बसवताना केला होता विरोध, आता उदयनिधी यांच्या हातातच 'सेंगोल' दिसले
7
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
8
बाप बन गया रे! रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, पापाराझींसमोर व्यक्त केल्या भावना
9
सोशल मीडियात ट्रेंड करणारे 'पंखेवाले बाबा' लड्डू मुत्या स्वामी नेमके कोण आहेत?
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
11
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
12
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
13
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
14
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
15
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
16
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
17
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
18
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
19
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
20
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार

लातूर-पुणे इंटरसिटीची मागणी; रेल्वेमार्गावर प्रवाशांची ताेबा गर्दी..!

By राजकुमार जोंधळे | Published: April 25, 2023 6:08 PM

रेल्वे विभागाच्या उदासिनतेने साेलापूरच्या धर्तीवर निर्णय हाेईना...

लातूर : महाराष्ट्रातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र म्हणून नावारूपाला आलेल्या लातूरला मात्र, रेल्वे विभागाकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. साेलापूरच्या धर्तीवर लातूर-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू करावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून लातूरकरांची आहे. मात्र, याकडे रेल्वे विभागाचे दुर्लक्ष हाेत असल्याचा आराेप केला जात आहे. सकाळ आणि सायंकाळच्या सुमारास इंटरसिटी नसल्याने प्रवाशांची माेठ्या प्रमाणावर हेळसांड हाेत आहे.

मुंबई-पुणे येथून लातूरला प्रवास करणाऱ्या प्रवाशांची जागा मिळत नसल्याने माेठी अडचण हाेत आहे. पर्याय म्हणून खासगी ट्रायव्हल्समधून प्रवास करावा लागताे. साेलापूरच्या धर्तीवर पहाटे आणि पुण्यातून सायंकाळी ५ वाजता इंटरसिटी धावते. याचा माेठ्या प्रमाणावर प्रवाशांना फायदा हाेताे. दिवसभर पुण्यात साेलापूरचे प्रवासी आपले कामकाज आटाेपून रात्री ११ वाजता घरी परततात. हा पॅटर्न लातूरसाठी सुरु केला तर लातुरातील हजाराे प्रवाशांची साेय हाेणार आहे. विशेष म्हणजे, लातूर-पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरच प्रवाशांची सर्वाधिक गर्दी आहे.

‘इंटरसिटी’चे वेळापत्रक ठरेल प्रवशांसाठी साेयीचे...लातूर रेल्वे स्थानकातून सकाळी ६ वाजता सुरु केली तर ती पुण्यात कार्यालयीन वेळेत ११ वाजेपर्यंत पुणे स्टेशनला पाेहचेल. त्यानंतर सायंकाळी पुण्यातून लातूरच्या दिशेने ५ वाजता रेल्वे धावली तर ती लातुरात रात्री १० ते ११ या वेळेत दाखल हाेईल. अर्थात सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळत पुण्यातील कामकाज सहज करणे सुलभ हाेणार आहे.

आणि प्रस्ताव रेल्वे मुख्यालयात पडून...रेल्वेे विभागाने पुणे-लातूर-पुणे ही नवीन एक्स्प्रेस रेल्वेगाडी प्रायाेगित तत्त्वावर सुरू करावी, असा प्रस्ताव मुख्यालयाला पाठविला असून, ताे परवानगी अभावी पडून असल्याची माहिती समाेर आली आहे. या प्रस्तावाला परवानगी मिळाल्यानंतर पुणे-लातूर-पुणे रेल्वेचा मार्ग माेकळा हाेणार आहे, असे रेल्वे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

इंटरसिटीला प्राधान्य द्यावे; लातूरकर प्रवाशांची मागणी...पुणे रेल्वे विभागाकडून प्रस्तावित असलेल्या रेल्वेचे वेळापत्रक गैरसाेयीचे ठरणार आहे. पुण्याहून सकाळी ७ वाजता लातूरला रेल्वे मार्गस्थ हाेईल. ती दुपारी १ वाजता लातुरात पाेहचणार आहे. पुन्हा दुपारी २ वाजता लातूर येथून ती पुण्याच्या दिशेने मार्गस्थ हाेणार आहे. यातून उलट प्रवशांची हेळसांडच हाेणार आहे. यासाठी इंटरसिटीला प्राधान्य देण्याची गरज आहे.

टॅग्स :laturलातूरRailway Passengerरेल्वे प्रवासीtourismपर्यटन