भीमा कोरेगाव शौर्य दिन साजरा
लातूर : प्रभाग क्र. ३ मधील महाबोधी बुद्ध विहारात भीमा कोरेगाव शौर्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी बबलू सातपुते, रुपेश गायकवाड, सिद्धार्थ सूर्यवंशी, दिलीप सातपुते, माणिक पाडोळे, राजू गवळी, अरुण सूर्यवंशी, धोंडूबाई साखळे, छबुबाई सातपुते, विमलबाई कांबळे, शांताबाई क्षीरसागर, रतन बेद्रे, दगडूबाई वाघमारे आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.
जिल्ह्यातील शाळेत ४८ टक्के विद्यार्थी उपस्थिती
लातूर : कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करीत जिल्ह्यातील ९ वी ते १२ वीच्या शाळा सुरू आहेत. एकूण १ लाख ६५ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी आहे. त्यापैकी ८१ हजार विद्यार्थी शाळेत उपस्थित राहत आहेत. हे प्रमाण ४८ टक्क्यांवर असून, शाळांच्या वतीने मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्स आदी नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे.
सावता विद्यालयात अभिवादन कार्यक्रम
लातूर : शहरातील संत सावता विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आराध्या कलबुर्गे, सिद्धी गुंडीबोयणे, प्रा.डाॅ. सुरेखा बनकर, प्राचार्य लक्ष्मण बादाडे यांची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
पंचायत समितीत आरओ पाणी
लातूर : लातूर पंचायत समितीमध्ये येणाऱ्या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी आरओ फिल्टर बसविण्यात आले आहे. ५०० लिटर शुद्ध पाणी दररोज उपलब्ध होत असून, अधिकारी, कर्मचाऱ्यांना शुद्ध पाणी उपलब्ध झाले असल्याचे शाम गोडभरले यांनी सांगितले.
वानवडा शाळेत विविध स्पर्धा उत्साहात
लातूर : औसा तालुक्यातील वानवडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये काव्य वाचन, काव्य गायन, निबंध, नाटिका आदी स्पर्धांचा समावेश होता. यावेळी शोभा माने, मुख्याध्यापक जगन्नाथ पांढरे, मीरा कुलकर्णी, रचना पुरी, ज्योती मांदळे, मंदाकिनी उकादेवडे, अनिता करुलकर आदींसह विद्यार्थी, शिक्षकांची उपस्थिती होती.