सुधाकर गोविंदराव देशपांडे (६४, रा. देशपांडे गल्ली, भालकी) असे मयताचे नाव आहे. सुधाकर देशपांडे यांच्या भावजयीचे शुक्रवारी निधन झाले होते. भावजयीच्या अस्थी विसर्जनासाठी ते व पुतण्या अश्विन देशपांडे (३५) हे दाेघे रविवारी सकाळी दुचाकी (केए ३९ के ११०३) वरून गोरचिंचोळी मार्गावरून नारंजा नदीकडे निघाले होते. दरम्यान, त्यांच्या दुचाकीस समोरून येणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या हैदराबाद - लातूर (एमएच १३ सीयू ९३५२)ने जोराची धडक दिली. यात सुधाकर देशपांडे हे जागीच मृत्यूमुखी पडले. पुतण्या अश्विन हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या दोन्ही पायांचे हाड मोडले आहे. त्यांच्यावर बीदर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद मेहकर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
मयत सुधाकर देशपांडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
भालकी (तुकाराम मोरे) भालकी येथील जुन्या गावातील देशपांडे गल्लीत राहणारे सुधाकर गोविंदराव देशपांडे वय ६४ यांचे रविवारी सकाळी अकराच्या सुमारास तालुक्यातील गोरचिंचोळी या क्रॉसवर भाळकी निलंगा या मुख्य राज्यमार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसला धडक लागल्यामुळे जागीच निधन झाले असून, त्यांचा पुतण्या आश्विन देशपांडे वय ३५ यांची दोन्ही पायांची हाडे मोडली असून, त्यास बीदर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.