महाराष्ट्र - कर्नाटक राज्याच्या सीमेवर असलेल्या भालकी तालुक्यातील जामखंडी, कोंगळी आणि वांजरखेडा तीन गावे तथा फत्तुतांडा, घोलतांडा आणि वांजरखेडा तांडा या तीन तांड्यांची ग्रुप ग्रामपंचायत कार्यरत आहे. या ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत एकंदरीत बारा हजार लोकसंख्या असून, १८ ग्रामपंचायत सदस्य आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य नागनाथ बगदुरे यांच्या नेतृत्वाखाली मागील काळात १८ महिला ग्रामपंचायत सदस्यांना बिनविरोध निवडून महिलाराज करण्यात आले होते. मागील तीस वर्षांत या वेळच्या निवडणुकीसह दोनवेळा येथे सार्वत्रिक निवडणुका झाल्या आहेत. यावेळी निवडणुकीत बगदुरे पॅनेलचे १८ पैकी १२ उमेदवार विजयी झाले आहेत. परिणामी, सलग ३० वर्षांपासून एकहाती सत्ता आहे. यावेळी सरपंचपद सर्वसाधारण पुरुष गटाला असल्याने कोंगळी येथील एकनाथ कारभारी यांना सरपंचपदी निवडण्यात आले आहे, तर उपसरपंच राखीव महिला प्रवर्गासाठी असल्याने सीता दत्तात्रय कांबळे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली आहे. निवडून आलेल्या सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा नागनाथ बगदुरे, शिवराज मुळे, शिवपुत्र धबाले, बजरंग पाटील, अशोक धबाले, आदी ग्रामस्थांनी सत्कार केला.
बारा काेटींचे कर्ज वाटप...
कर्नाटक राज्यात शेतकऱ्यांसाठी पीकेपीएस बँक, सोसायटी खूप मोठा आर्थिक आधार असून, या सोसायटीत ९८ टक्के शेतकरी सदस्य आहेत. या सोसायटीने बारा कोटींचे कर्ज वाटप केले आहेत. तीन कोटींचे डिपॉझिट आहे. नफ्याच्या बाबतीत जिल्ह्यात ही सोसायटी प्रथम क्रमांकाची असल्याचे सोसायटी चेअरमन नागनाथ बगदुरे यांनी सांगितले.