यावेळी प्रा. शाम डावळे, राष्ट्रवादीच्या डॉक्टर्स सेलच्या तालुकाध्यक्ष डाॅ. भाग्यश्री घाळे, गटसचिव रामकिशन जाधव, युवक तालुका उपाध्यक्ष गोपाळ कोदळे, सरपंच चंद्रकला कांबळे, उपसरपंच कल्पेश जाधव, अंकुश गुंडरे, गीतांजली शेवाळे, बलभीम जाधव, सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब जाधव, विठ्ठल शेवाळे, सतीश सदाफुले, बापूसाहेब कांबळे, विजय कांबळे, एकनाथ शेवाळे, तुकाराम जाधव, लक्ष्मण जाधव, माधव सदाफुले, विनोद माकणे, डॉक्टर्स सेलचे डॉ. सोहेल चिश्ती, डॉ. विक्रम माने, डॉ. खुटाणबुजे, डॉ. सुनील बनशेळकीकर, डॉ. रवी मुळे, डॉ. सतीश जाधव, डॉ. इर्शाद तांबोळी, डॉ. साईराम थगनर आदींची उपस्थिती होती.
यावेळी डॉ. भाग्यश्री घाळे म्हणाल्या, रोगराईच्या काळात बालकांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपाय केले पाहिजे. सुवर्णबिंदूप्राशन व तत्सम आयुर्वेदोपचार, सकस पोषक आहाराच्या सहाय्याने हे शक्य होईल. तसेच रोगराई टाळण्यासाठी वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच आपल्या सभोवतालचा परिसरही स्वच्छ असणे आवश्यक आहे.