देवणी : तालुक्यातील जुलै ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित होणाऱ्या एकूण ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदार यादी कार्यक्रम सुरु झाला आहे. प्रारुप मतदार यादी प्रशासनाने मंगळवारी तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या दर्शनी भागावर प्रसिद्ध केली आहे.
सदरील प्रारुप मतदार यादीवर हरकती अथवा सूचना असल्यास ७ डिसेंबरपर्यंत कालावधीत देण्यात आला आहे. अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी १० डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती प्रभारी तहसीलदार हिसामोद्दीन शेख यांनी दिली. तालुक्यातील आनंदवाडी, बोळेगाव, अंबानगर, सावरगाव, संगम, इंद्राळ, मानकी, सिंधीकामठ, लासोना, तळेगाव, होनाळी, अनंतवाडी, वलांडी, कोनाळी, अजनी, गुरधाळ, कमरोद्दीनपूर, आंबेगाव, कवठाळा, अचवला, गुरनाळ, बटनपूर, गौंडगाव, विळेगाव, हंचनाळ, देवणी (खु.), नेकनाळ, धनेगाव, कमालवाडी, भोपणी, जवळगा, नागराळ, वागदरी, डोंगरेवाडी या गावांना निवडणुकीची चाहूल लागली आहे. गेल्या महिन्यात सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने आणि प्रारुप मतदार याद्या प्रकाशित झाल्याने गावातील राजकीय मंडळी आतापासूनच तयारी करीत आहेत.