शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

ई-केवायसी रखडली; ३३७० शेतकरी ‘प्रोत्साहन’पासून वंचित!

By संदीप शिंदे | Published: February 17, 2023 10:11 PM

कर्जमुक्ती योजना : ८६ हजार जणांना २८९ कोटींचे अनुदान वितरित

- संदीप शिंदेलातूर : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत ५० हजारांपर्यंत प्रोत्साहन अनुदान वितरित करण्यात येत आहे. त्यानुसार आतापर्यंत ८६ हजार ५८० जणांना २८९ कोटी ६४ लाखांचे अनुदानही दिले आहे. मात्र, ३ हजार ३७० शेतकऱ्यांनी अद्यापही ई-केवायसी केलेली नाही. त्यामुळे हे शेतकरी प्रोत्साहनच्या लाभापासून वंचित आहेत.

जिल्ह्यात मागील तीन वर्षांत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १ लाख ८४ हजार ९५६ आहे. त्यानुसार या शेतकऱ्यांची यादी प्रोत्साहन अनुदानासाठी शासनाकडे पाठविण्यात आली आहे. आतापर्यंत दोन याद्या जाहीर झाल्या असून, यामध्ये १ लाख ३० हजार ३८४ जणांचा समावेश आहे. यातील १ लाख २७ हजार १४ जणांनी ई-केवायसी केलेली आहे. त्यापैकी ८६ हजार ५८० शेतकऱ्यांच्या खात्यावर २८९ कोटी ६४ लाखांचे अनुदान वर्ग करण्यात आले आहे.

पहिल्या यादीत ४८ हजार शेतकऱ्यांची नावे आली होती. यातील ४५ हजार जणांच्या खात्यावर १५४ कोटी वर्ग करण्यात आले. दुसऱ्या यादीत ८३ हजार शेतकऱ्यांची नावे आली असून, त्यातील ४१ हजार जणांच्या खात्यावर १३२ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. २०१८-१९, २०१९-२० आणि २०२०-२१ या तीन वर्षांमध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्यात येत आहे. दरम्यान, अद्यापही तिसरी यादी जाहीर झालेली नाही. त्यामुळे ५४ हजार शेतकरी या यादीच्या प्रतीक्षेत आहेत.

७३२ शेतकऱ्यांनी मांडल्या तक्रारी...यादीत नाव आल्यास संबंधित शेतकऱ्यास बँकेत संपर्क साधावा लागतो. तेथे विशिष्ट क्रमांक देऊन कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. त्यानंतर प्रोत्साहनापोटी मिळणारी रक्कम मंजूर असल्यास शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्यात येते. त्यानुसार आतापर्यंत ८६ हजार जणांना २८९ कोटींचे अनुदान मिळालेले आहे.

तहसीलस्तरावर २१५ तक्रारी प्राप्त...जिल्ह्यात एकूण ७३२ तक्रारी प्राप्त आहेत. त्यानुसार ९५ तक्रारी जिल्हास्तरावर आहेत. २७४ तक्रारी प्रलंबित आहेत, तर तहसीलस्तरावर २१५ तक्रारी सोडविण्यात आल्या आहेत. तहसीलस्तरावर १४८ तक्रारी रखडलेल्या असून, त्या तातडीने सोडविण्याच्या सूचना शासनाकडून करण्यात आलेल्या आहेत.

ई-केवायसी करण्याचे आवाहन...ज्या शेतकऱ्यांचे प्रोत्साहन अनुदानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या यादीत नाव आले आहे. त्यांनी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. ई-केवायसी केल्यावरच पुढील प्रक्रिया केली जाणार आहे. सध्या ३३७० शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही. त्यांनी तातडीने ई-केवायसी करण्याचे आवाहन उपनिबंधक कार्यालयाने केले आहे.

अशी आहे प्रोत्साहनची आकडेवारी...पात्र शेतकरी - १,८४,९५६पहिली यादी - ४८,०००दुसरी यादी - ८३,०००विशिष्ट क्रमांक - १,३०,३८४ई-केवायसी झालेले - १,२७,०१४ई-केवायसी रखडली - ३,३७०अनुदान मिळालेले - ८६,५८०अनुदान रक्कम - २८९ कोटी ६४ लाख

टॅग्स :Farmerशेतकरीlaturलातूर