शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

किल्लारीला भूकंपाचा सुक्ष्म धक्का; नागरिकांत भीती

By हरी मोकाशे | Published: November 19, 2022 12:46 PM

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हासुरी परिसरात ६ सप्टेंबरपासून ते ४ ऑक्टोबरपर्यंत भूगर्भातून गुढ आवाज येऊन भूकंपाचे आठ सौम्य धक्के जाणवले होते.

लातूर : औसा तालुक्यातील किल्लारी व परिसरातील येळवट, सिरसल, मंगरुळ, एकाेंडीस शुक्रवारी रात्री २.०७ वा. च्या सुमारास भूकंपाचा सुक्ष्मा धक्का जाणवला. यात कुठलेही नुकसान झाले नसले तरी नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. शनिवारी सकाळी नागरिक भूकंपाची चर्चा करीत होते. भूकंपाच्या या धक्क्यामुळे १९९३ च्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हासुरी परिसरात ६ सप्टेंबरपासून ते ४ ऑक्टोबरपर्यंत भूगर्भातून गुढ आवाज येऊन भूकंपाचे आठ सौम्य धक्के जाणवले होते. या ठिकाणाची जिल्हाधिकाऱ्यांसह नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र विभाग आणि दिल्लीच्या पथकाने पाहणी करुन सतर्कतेच्या सूचना केल्या होत्या. दरम्यान, औराद शहाजानी आणि आशिव येथे भूकंपमापन केंद्र बसविण्यात आले.

जवळपास दीड महिन्याने पुन्हा किल्लारीस शुक्रवारी रात्री २.०७ वा. च्या सुमारास भूकंपाचा सुक्ष्म धक्का जाणवला. त्याची लातूर, औराद शहाजानी आणि आशिव येथील भूकंपमापन केंद्रावर नोंद झाली असून तो धक्का २.४ रिस्टर स्केलचा होता. यात कुठलेही नुकसान झाले नाही, असे किल्लारी ठाण्याचे सपोनि सुनील गायकवाड यांनी सांगितले.

नागरिकांनी सतर्क रहावे...शुक्रवारी रात्री २.०७ वा. किल्लारीस २.४ रिस्टर स्केलचा सुक्ष्म धक्का जाणवला. तेथील नागरिकांशी संवाद साधून माहिती घेण्याबरोबरच सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. नागरिकांनी कच्च्या घरात राहू नये. भूकंपाचा धक्का जाणवताच खुल्या जागेत थांबावे. किल्लारी केंद्रबिंदू आहे.- साकेब उस्मानी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी.

टॅग्स :laturलातूरEarthquakeभूकंप