महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरण व शिक्षणाचे वैश्विकरण या विषयावर कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी प्राचार्य डॉ.माधव गादेकर, प्राचार्य डॉ.सुरेश वाघमारे, डॉ.श्रीकांत गायकवाड, मुख्याध्यापक डॉ.सुवर्णा जाधव, डॉ.अनिल जायभाये, बालकल्याण समिती सदस्य ॲड. रजनी गिरवलकर, सविता कुलकर्णी, रंजीता कोताळकर, मनीषा तोकले, अशोक तांगडे, बी.पी. सूर्यवंशी, डॉ. संजय गवई यांची उपस्थिती होती.
डॉ. कुंभार म्हणाले, शिक्षण हे सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी ही शासन, स्वयंसेवी संस्था आणि समाज यासर्वांची आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये सांघिक रचना निर्माण होणे गरजेचे आहे. तसेच शैक्षणिक विकेंद्रीकरण होणे सुद्धा महत्त्वाचे आहे, असे झाले तरच खाजगीकरण आणि व्यापारीकरणाला आपल्याला मज्जाव घालता येईल. आज शिक्षणामध्ये स्वायत्तता व शैक्षणिक संपन्नता निर्माण होणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. यशस्वीतेसाठी प्रा.गुणवंत बिरादार, विश्वनाथ तोडकर, डॉ.पी.डी. जोशी, रमेश भिसे, श्रीराम वाघमारे, कस्तुरा कारभारी, प्रा.आशिष स्वामी, प्रा.परमेश्वर पाटील, शिवदर्शन सदाकाळे, प्रतिमा कांबळे, धनराज पवार, आश्विनी मंदे, अक्षता सूर्यवंशी, अंजली कुलकर्णी, मारुती देवकते, सुशील मिरलकर, बापू सूर्यवंशी, अलका सन्मुखराव, अपेक्षा वाघमारे, मधुकर गालफाडे, शालू साके, अर्जुन बंडगर, ओम ढमाले, सतीश मस्के आदींनी परिश्रम घेतले.