शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

लातूर परिमंडळात आठ लाख घरगुती वीजग्राहकांची महावितरणच्या गोग्रीन सुविधेकडे पाठ

By आशपाक पठाण | Published: September 26, 2023 6:42 PM

कागदविरहीत वीजबील सुविधेवर दहा रूपयांची सवलत

लातूर : महावितरणच्या पर्यावरण पुरक गोग्रीन सुविधेला लातूर परिमंडलातील ८ लाख १८ हजार ४४ ग्राहकांपैकी केवळ १५ हजार ११ ग्राहकांनी कागदविरहित बिलाचा अर्थात गोग्रीन सुविधेचा लाभ घेतला आहे. ही सुविधा घेणाऱ्या ग्राहकांना दरमहा १० रूपयांची सवलत मिळत असली तरी ८ लाख ग्राहकांनी याकडे पाठ फिरविली आहे.

वीजग्राहकांना ऑनलाईन वीजबील भरण्यास प्रोत्साहीत करण्याकरिता महावितरणने विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या धोरणाला अधिक प्रोत्साहित करण्यासाठी जे वीजग्राहक छापील वीजबिलाऐवजी ई-मेल व एसएमएसचा पर्याय स्विकारतील अशा सर्व ग्राहकांना प्रतीबील १० रुपये सवलत दिली जात आहे. गो-ग्रीनचा पर्याय निवडल्यास वीजबिलावरील सवलतीसह ग्राहकांना तातडीने वीजबील मिळणार असून संदर्भासाठी वीजबिलाचे जतन करणेही सोपे राहणार आहे. तसेच गो-ग्रीनचा पर्याय पर्यावरणाला पूरक असणार आहे.

११ हजार ग्राहकांनीच निवडला पर्याय...लातूर परिमंडलांतर्गत लातूर जिल्हयातील लातूर विभाग ३ हजार ६१९, निलंगा विभाग १ हजार ९९ तर उदगीर विभागातील १ हजार ८२७ वीजग्राहकांनी तसेच बीड जिल्हयातील अंबाजोगाई विभागात २ हजार ५४१ व बीड विभागात २५४१ वीजग्राहकांनी गोग्रीन सुविधेला पसंती दिली आहे. त्याचबरोबर धाराशिव जिल्हयातील तुळजापूर विभागाच्या १ हजार १९९ तर धाराशिवच्या २ हजार २९४ वीजग्राहकांनी गोग्रीन सुविधेला पसंती दर्शविली आहे.

वर्षाला १२० रूपयांची होते बचत...वीजबिलासाठी ई-मेल व एसएमएसचा पर्याय निवडल्याने वीजग्राहकांना प्रत्येक महिन्यातील वीजबिलामागे १० रुपयांची, तर वर्षाला १२० रुपयांची सवलत मिळत आहे. जे ग्राहक गो-ग्रीन सुविधेचा पर्याय निवडतात, अशा ग्राहकांना छापील बिलाऐवजी ईमेल व एसएमएसद्वारे वीजबील उपलब्ध करून दिले जाते. गो-ग्रीनचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी आपल्या वीजबिलावरील १५ अंकी गो-ग्रीन क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे अथवा महावितरणच्या संकेत स्थळावर जाऊन करावी लागणार आहे. वीजग्राहकांनी कागद विरहीत गो-ग्रीन सुविधेचा वापर करावा, असे आवाहन मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी केले आहे.

टॅग्स :laturलातूरelectricityवीज