शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हालकी येथील एकाच्या शेतात पत्त्यावर पैसे लावून तिर्रट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून शिरूर अनंतपाळ ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवारी दुपारी छापा टाकला. तेव्हा आठजण तिथे जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी रोख रक्कम तीन हजार २४० रुपये, मोबाईल व चार मोटारसायकली असा एकूण तीन लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दोन माजी सरपंचांचा समावेश आहे. यातील तीन आरोपी फरार झाले आहेत.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी व संचारबंदी लागू केली असतानाही वरील आरोपी तिर्रट नावाचा जुगार खेळताना आढळून आल्याने शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात पोलीस नाईक लतिफ सौदागर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. लतिफ सौदागर व पोहेकाॅ एम. एन. कच्छवे करीत आहेत.