शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
3
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
4
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
5
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
6
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
7
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
8
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
9
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
10
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
11
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
12
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
13
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
14
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
15
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
16
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
17
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
18
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
19
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
20
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?

मान्सूनवर 'अल निनो'चे सावट; जूननंतर पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासन अलर्ट माेडवर !

By संदीप शिंदे | Published: April 12, 2023 8:06 PM

१ जुलै ते ३१ ऑगस्टमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी सव्वाचार कोटींचा आराखडा

लातूर : हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण पॅसिफिक महासागरातील अल निनो या समुद्र प्रवाहाच्या सक्रियतेमुळे मान्सून पर्जन्यमानावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जूननंतर देखील पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागू शकतात. परिणामी, मान्सूनवर अल निनोचे सावट असल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आले असून, आता १ जुलै ते ३१ ऑगस्टपर्यंत टंचाई निवारणासाठी सव्वाचार कोटी रुपयांचा विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे.

जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी मार्च ते जूनपर्यंत टंचाई निवारणासाठी कृती आराखडा तयार करण्यात येत असतो. यावर्षीही ४ कोटी १६ लाख रुपयांच्या कृती आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार दक्षिण पॅसिफिक महासागरातील अल निनो या समुद्र प्रवाहाच्या सक्रियतेमुळे पावसाळा लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे जून ते ऑगस्ट या काळात टंचाई भेडसावू शकते. परिणामी, प्रशासनाने जि.प. पाणीपुरवठा विभागाला सूचना करीत जुलै व ऑगस्ट महिन्यासाठी विशेष आराखडा तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार विविध उपाययोजनांचा समावेश असलेला ४ कोटी ३४ लाख ८९ हजार रुपयांचा विशेष टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यास मंजुरीही देण्यात आलेली आहे.

६०७ गावांमध्ये जाणवू शकते टंचाई...१ जुलै ते ३१ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यातील ५२४ गावे आणि ८३ वाड्या असे एकूण ६०७ गावांमध्ये टंचाई जाणवू शकते. त्यामुळे प्रशासनाने आराखडा तयार केला आहे. यामध्ये १०१ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, ४७५ गावातील विहीर, विंधन विहिरीचे अधिग्रहण करणे, तात्पुरत्या पूरक नळयोजना राबविणे, विहिरीचे खाेलीकरण करणे, बुडक्या घेणे, विंधन विहिरी घेणे, विंधन विहिरीची विशेष दुरुस्ती करणे, प्रगती पथावरील नळयोजना पूर्ण करणे आदी उपाययोजनांचा समावेश आहे.

अधिग्रहणावर होणार सर्वाधिक खर्च...मार्च ते जूनपर्यंत यापूर्वीच ४ कोटी १६ लाखांचा आराखडा मंजूर आहे. तर जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांसाठी ४ कोटी ३४ लाखांचा विशेष आराखडा तयार आहे. यामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी १ कोटी ३७ लाख, खासगी विहीर, विंधन विहिरीचे अधिग्रहणावर २ कोटी ६ लाख तर विंधन विहिरी घेण्यासाठी १२ लाख खोलीकरणासाठी १२ लाख विंधन विहिरींच्या विशेष दुरुस्तीसाठी ३ लाख आणि नळयोजनांच्या विशेष दुरुस्तीसाठी ५४ लाख ५० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

जलजीवनमुळे टंचाईची तीव्रता कमी होणार...प्रत्येक कुटुंबाला पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी जलजीवन योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार या योजनेची अनेक गावांत कामे पूर्ण झाली असून, काही गावांत प्रगतिपथावर आहे. त्यामुळे उन्हाळ्यात या गावांना जलजीवन अंतर्गत पाणीपुरवठा केल्यास टंचाईच्या झळा कमी होण्यास मदत होणार आहे. सोबतच टंचाई आराखड्यावरील खर्चाचा आकडाही कमी होणार आहे.

टॅग्स :Rainपाऊसlaturलातूर