शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
5
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
6
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
8
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
9
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
10
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
11
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
13
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
14
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
15
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
16
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
17
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
18
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
19
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
20
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

वृद्ध साहित्यिक, कलावंत निवडीला मुहूर्त लागेना; लातूर जिल्हा परिषदेत कलाकारांचा ठिय्या

By हरी मोकाशे | Published: July 22, 2024 7:44 PM

राज्य शासनाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजना राबविण्यात येते.

लातूर : राज्य शासनाच्या राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजनेसाठी गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यातील वृद्ध साहित्यिक, कलावंतांची निवड झाली नाही. त्यामुळे या कलाकारांतून नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, सोमवारी प्रस्तावधारक कलाकारांनी जिल्हा परिषदेत धाव घेऊन निवड प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी करीत ठिय्या मांडला होता.

आयुष्यभर कला आणि साहित्य क्षेत्राची सेवा केलेल्या साहित्यिक व कलावंतांना वयोवृद्ध कालावधीत व्यवस्थित उपजीविका करता यावी, म्हणून राज्य शासनाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजना राबविण्यात येते. या अंतर्गत जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांची समितीमार्फत निवड करण्यात येऊन मानधन दिले जाते. योजनेमुळे वृद्ध कलावंतांचे जीवनमान उंचावण्यास मदत होण्याबरोबर राज्यातील काही सांस्कृतिक कलाकृतींचे जतन व संवर्धन होण्यास मदत होते.निवडीसाठी तारीख निश्चित करा...राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन योजनेंतर्गत सन २०२१-२२, २०२२-२३ आणि २०२३-२४ या तीन वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांची निवड झाली नाही. दरम्यान, गत वर्षी जिल्हास्तरीय निवड समिती गठित करण्यात आली. या समितीने जिल्हा परिषदेकडे जिल्ह्यातील ज्येष्ठ कलावंतांची निवड करण्यासाठी तारीख निश्चित करावी, अशी मागणी केली. सोमवारी जिल्हा परिषदेत धाव घेऊन आपली मागणी लावून धरीत ठिय्या मांडला होता.

१ हजार ३५० प्रस्ताव पात्र...

योजनेच्या लाभासाठी तीन वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात प्रस्ताव दाखल झाले होते. समाजकल्याण विभागाकडून त्याची छाननी करण्यात आली. त्यात १ हजार ३५० प्रस्ताव पात्र झाले आहेत. त्यामुळे आता लवकरच निवड चाचणी होईल, अशी आशा होती. मात्र, अद्यापही निवड न झाल्याने जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष फुलचंद अंधारे, उपाध्यक्ष ज्ञानोबा भिसे, सदस्य बालाजी गाडेकर यांच्यासह जवळपास दीडशे प्रस्तावधारकांनी ठिय्या मांडला होता.नव्या आदेशाने नवा पेच...राज्य शासनाने मार्चमध्ये योजनेत सुधारणा करीत जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्षपद जिल्हाधिकाऱ्यांकडे साेपविले आहे, तर सदस्य सचिव म्हणून जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काम पाहावे, असे स्पष्ट केले आहे. यापूर्वी जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष हे अशासकीय होते, तर सदस्य सचिव अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी होते. नव्या आदेशामुळे कलावंत निवडीचा पेच निर्माण झाला आहे.

सदस्य सचिवांमार्फत प्रस्ताव... जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांच्या निवडीसाठी शासनाच्या नवीन आदेशानुसार जिल्हास्तरीय सदस्य सचिवांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दाखल करण्यात येणार आहे. लवकरच निवड प्रक्रिया होईल.- संतोषकुमार नाईकवाडी, समाजकल्याण अधिकारी.

टॅग्स :laturलातूरLatur z pलातूर जिल्हा परिषद