शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

१३ व्या दिवशीही आडत बंद; नोटिशीची मुदत संपल्याने बाजार समिती कोणती भूमिका घेणार?

By हरी मोकाशे | Published: July 13, 2024 7:48 PM

पेच कायम : तोडगा निघत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण

लातूर : शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये म्हणून बाजार समितीने बजावलेल्या नोटिसांची मुदत संपली आहे. तरीही खरेदीदार शेतमाल खरेदीसाठी शनिवारी बाजारपेठेत उतरले नाहीत. सौदा न निघाल्याने १३ व्या दिवशीही आडत बाजार बंद राहिला. त्यामुळे आता बाजार समिती कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान, खरेदीदार- आडत्यांच्या तिढ्यात हमाल मापाडी, शेतकऱ्यांची अडचण होत आहे.

राज्यात लौकिक असलेल्या लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत १ जुलैपासून शेतीमालाच्या पैश्यावरुन वाद निर्माण झाला आहे. पणन कायद्यानुसार खरेदीदारांनी शेतमाल खरेदी केल्यानंतर २४ तासांत पैसे द्यावेत, अशी मागणी आडते करीत आहेत, तर पूर्वीप्रमाणे शेतमाल खरेदी केल्यानंतर नवव्या दिवशी धनादेश देण्याच्या भूमिकेवर खरेदीदार ठाम आहेत. त्यामुळे बाजार समिती १३ दिवसांपासून बंद आहे. परिणामी, आडत बाजारात शुकशुकाट असून दररोजची जवळपास १५ हजार क्विंटलची आवक थांबली आहे.

सोमवारी निर्णय होईल...खरेदीदार व आडत्यांमधील तिढा सोडविण्यासाठी बाजार समितीने आजपर्यंत आठ बैठका घेतल्या आहेत. तसेच जिल्हा उपनिबंधक, जिल्हाधिकाऱ्यांकडेही हा प्रश्न मांडला. जिल्हा उपनिबंधकांच्या सूचनेनुसार खरेदीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्याची मुदत संपली आहे. आता कोणती कारवाई करायची याबाबत सोमवारी निर्णय होईल.- सतीश भोसले, प्रभारी सचिव.

परवाने निलंबित, रद्द करण्याच्या सूचना...शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये म्हणून व्यापाऱ्यांना नोटिसा देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार बाजार समितीने नोटिसा बजावल्या. त्याची मुदतही संपली आहे. शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्यांचे परवाने निलंबित अथवा रद्द करण्याच्या पुन्हा सूचना केल्या आहेत.- संगमेश्वर बदनाळे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी).

टॅग्स :laturलातूरAgriculture Sectorशेती क्षेत्रmarket yardमार्केट यार्ड