शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

प्रतिकूल परिस्थितीतही बळीराजा हरला नाही; एक एकरात घेतले १५ क्विंटल हरभरा उत्पादन

By आशपाक पठाण | Published: February 08, 2024 1:12 PM

चाकूर तालुक्यातील सुगाव येथील योगेश्वर शिंदे यांचा प्रयोग

लातूर : रब्बी हंगामातील पिकांचे बहुतांश उत्पादन निसर्गाच्या कृपेवर अवलंबून असते. त्यामुळे अनेकदा अपेक्षित उत्पादन मिळत नाही. मात्र, चाकूर तालुक्यातील सुगाव येथील योगेश्वर श्रीकृष्ण शिंदे या तरुण शेतकऱ्याने एक एकर क्षेत्रावर तब्बल १५ क्विंटल हरभऱ्याचे उत्पादन घेतले आहे. हवामानाची प्रतिकूल परिस्थिती असतानाही एकरी १५ क्विंटलचा उतारा दिलासादायक आहे.

चाकूर तालुक्यातील सुगावचे शेतकरी श्रीकृष्ण शिंदे हे प्रयोगशील शेतकरी आहेत. देशभरात विविध ठिकाणच्या कृषी संशोधन केंद्रांना भेटी देऊन नवीन वाण, उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवितात. यावर्षी त्यांनी रब्बी हंगामात आंध्र प्रदेशातील नंदियाल येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातून हरभऱ्याचे एनबीईजी ७७६ हे बियाणे आणले होते. १०५ दिवसांचे पीक असलेल्या हरभऱ्याला पेरणीनंतर एकदाही पाणी देण्याची गरज भासली नाही. पेरणीनंतर दोन वेळा पाऊस झाला. वातावरणातील बदलामुळे अळीचा प्रादुर्भावही झाला होता.

मात्र, फवारणीनंतर पिकाने जोर धरला. ऑक्टोबर महिन्यात पेरणी झालेला हरभरा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात काढण्यात आला. पीक कापणी प्रयोग प्रात्यक्षिकात एक एकर क्षेत्रावर तब्बल १५ क्विंटलचे उत्पादन झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा ५ एकरी पाच क्विंटलही उत्पादन निघेल की नाही, अशी भीती असताना शिंदे यांना भरघोस उत्पादन झाले आहे.

पीक कापणी प्रयोगात उतारारब्बी हंगामातील हरभऱ्याला साधारणत: दहा क्विंटलचे उत्पादन निघते. तेही हवामान चांगले असायला हवे. सुगाव येथील शेतकरी योगेश्वर श्रीकृष्ण शिंदे या शेतकऱ्याने पेरणी केलेल्या हरभऱ्याचे मंडळ कृषी अधिकारी शिरीष खंदारे यांच्या उपस्थितीत पीक कापणी प्रयोग करण्यात आला. यात एका एकरात १५ क्विंटल हरभरा निघाला आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीOsmanabadउस्मानाबाद