कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे विद्यार्थ्यांना संक्रमण होऊ नये म्हणून राज्य शासनाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. त्यामुळे परीक्षेवर होणारा खर्च आता होणार नाही. ग्रामीण भागातील पालकांनी आपल्या मुलांच्या परीक्षेचे शुल्क भरले होते. मात्र, आता परीक्षा होणार नसल्याने हे शुल्क विद्यार्थ्यांच्या नावावर जमा करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
शासनाने लवकरात लवकर शुल्क परत करावे, अशी मागणी सत्यवान पांडे, अजिज मिस्त्री, मनोहर वाकळे, महेश शेट्टे, शिवानंद देशमुख, संग्राम कदम, संग्राम पाटील, उत्तम केंद्रे, राजू पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद भ्रमण्णा, धनंजय भ्रमण्णा, श्याम डांगे, चेअरमन अशोक डांगे, माजी जि.प. सदस्य चंदन पाटील, पं.स. सदस्य शिवाजीराव डुकरे, बाळू देवशेट्टे, जिल्हा बँकेचे संचालक धर्मपाल देवशेट्टे, सरपंच सत्यवान पाटील, साहेबराव पाटील यांनी केली आहे.