शहरं
Join us  
Trending Stories
1
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
2
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
3
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
4
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
5
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
6
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
7
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
8
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
9
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
10
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
11
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
12
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
13
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
14
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
15
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार
16
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
17
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
18
फेका’फेक’ थांबवण्याचा ‘लोकशाही’ मार्ग
19
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
20
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान

अतिवेगमर्यादा, विनाहेल्मेट प्रवास अंगलट; दोन दिवसांत २ लाख ३८ हजारांचा दंड

By आशपाक पठाण | Published: August 06, 2023 7:04 PM

लातूर पोलिस 'अलर्ट मोड'मध्ये, स्पीड गनची नजर

आशपाक पठाण/ लातूर: रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हेल्मेटचा वापर अत्यंत महत्त्वाचा आहे. दुचाकी चालवीत असताना हेल्मेटचा वापर न केल्यास अपघातात जीव गमावण्याची शक्यता अधिक असते. वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने रस्त्यावर ओव्हरस्पीड धावणारी वाहने टिपणारी स्पीडगन आता दुचाकीवर विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्यांवर नजर ठेवून आहे. दोन दिवसांत विनाहेल्मेट जाणाऱ्या २३८ जणांवर कारवाई करून २ लाख ३८ हजार दंड आकारण्यात आला आहे.

स्पीडगनच्या माध्यमातून अतिवेगाने धावणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांवर कारवाई केली जाते. एखाद्या रस्त्यावर ठरवून दिलेल्या वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांना न थांबवता स्वयंचलित यंत्राच्या माध्यमातून दंड आकारला जातो. या गनमध्ये आपण कोणत्या ठिकाणी नियमाचे उल्लंघन केले, विनाहेल्मेट कोठून प्रवास केला याची पूर्ण माहिती मिळते. एरवी स्पीडगन केवळ गती नियंत्रित राहावी, यासाठी काम करीत होते. आता मात्र, त्यात बदल झाला असून विनाहेल्मेटच्याही केसेस केल्या जात आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने महिनाभरात ५१५ जणांवर ऑनलाइन दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे प्रमुख मार्गावरून प्रवास करीत असताना हेल्मेटचा वापर करणे आवश्यक आहे, अन्यथा दंड सहन करावा लागणार आहे.

आरटीओचे दोन पथक रस्त्यावर...लातूरच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे दोन पथक स्पीडगनच्या माध्यमातून कारवाई मोहीम राबवीत आहेत. औसा रोडवर दोन दिवसांत तब्बल ३०० वाहनधारकांना विनाहेल्मेटचा दंड आकारण्यात आला आहे. स्पीडगनच्या समोरून अतिवेगाने जाण्याबरोबरच विनाहेल्मेट प्रवास करणेही आता महागात पडणार आहे. जुलै महिन्यात आरटीओच्या पथकाने ५१५ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

स्पीडगनची वक्रदृष्टी...

वेगमर्यादेचे उल्लंघन करणारी वाहने स्वयंचलित स्पीडगनमध्ये टिपली जातात. यासाठी लातूर जिल्ह्यात अंबाजोगाई, नांदेड, तुळजापूर, बार्शी रोडवर शहराच्या बाहेर स्पीडगन बसविली जातात. स्पीडगनच्या समोरून नियमांचे उल्लंघन करून जाणारी वाहने त्यात कैद होतात. विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या ५१५ वाहनधारकांना यातून दंड आकारण्यात आला असल्याचे उपप्रादेशिक विभागाकडून सांगण्यात आले.

सहा महिन्यांत १५ लाखांचा दंड...विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यास १ हजार रुपये दंडाची तरतूद आहे. त्यानुसार प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाकडून मागील सहा महिन्यांत ५१२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना १५ लाख १२ हजार रुपये दंडही आकारण्यात आला आहे. स्पीडगनद्वारे आता वेगमर्यादेबरोबरच विनाहेल्मेटची कारवाई केली जात असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरtraffic policeवाहतूक पोलीस