लातूर :रेल्वेविभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या दहा एक्स्प्रेस आणि दाेन पॅसेंजर रेल्वेगाड्या सध्याला लातूर रेल्वेस्थानकातून सुसाट आहेत. परिणामी, रेल्वेगाड्यांना प्रवाशांचा माेठा प्रतिसाद मिळत असल्याने अनेकांना तत्काळमध्येही तिकीट मिळत नाही. यासाठी किमान आठवडाभरापूर्वीच तिकीट बुकिंग करावे लागत आहे. उन्हाळ्यातील प्रवासाचे नियाेजन आताच करावे लागत आहे. लातुरातून धावणाऱ्या एक्स्प्रेसपैकी लातूर-मुंबई, बीदर-मुंबई रेल्वेला माेठा प्रतिसाद मिळत आहे.
लातूर रेल्वेस्थानकातून एकूण बारा रेल्वेगाड्या धावत असून, त्या रेल्वेला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. उन्हाळी हंगामातील प्रवाशांची वाढती संख्या डाेळ्यांसमाेर ठेवून रेल्वेविभागाने जादा रेल्वेगाड्यांची व्यवस्था करण्याची मागणी आतापासूनच हाेत आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा झाल्या आहेत. त्यामुळे रेल्वेला प्रवाशांची माेठी गर्दी हाेत आहे. एप्रिल महिन्यातही ही संख्या दुपट्टीवर जाण्याची शक्यता आहे. दर मे आणि जून महिन्यात प्रवाशांना तिकीट कन्फर्म न झाल्याने ऐनवेळी हाेणारी हेळसांड सहन करावी लागते.
अपुऱ्या रेल्वेगाड्या; अनेक प्रवासी वेटिंगवर...बीदर-लातूर-कुर्डूवाडी ते पुणे-मुंबई या मार्गावर सर्वाधिक प्रवासी संख्या आहे. या मार्गावर दरदिवशी एक किंवा दाेन रेल्वेगाड्या धावतात. परिणामी, अपुऱ्या रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांची माेठ्या प्रमाणावर हेळसांड हाेत आहे. या मार्गावर दिवस आणि रात्रीच्या रेल्वेगाड्यांची व्यवस्था करावी लागणार आहे. ऐनवेळी रेल्वेचे तिकीट कन्फर्म न झाल्याने अनेकांना खासगी वाहनांचा आधार घेत प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे.
साेलापूर-तिरुपतीची वेळ ठरली गैरसायीची...साेलापूर येथून तिरुपतीसाठी धावणाऱ्या एक्स्प्रेस रेल्वेची लातूर येथील वेळ प्रवाशांसाठी गैरसाेयीची आहे. पहाटे २.३० वाजता रेल्वेस्थानकावर साेलापूर-तिरुपती रेल्वे दाखल हाेते. ती एक तर पहाटे ५ अथवा, रात्री ११ अशी ठेवली तर प्रवाशांना प्रवास करणे साेयीचे हाेणार आहे. ही वेळ बदलावी, अशी मागणी प्रवाशांतून हाेत आहे.
लातूर स्थानकातून या धावतात रेल्वेगाड्या...गाड्या प्रकार नियाेजनलातूर - मुंबई एक्स्प्रेस चार दिवसबीदर - मुंबई एक्स्प्रेस तीन दिवसहैदराबाद - हडपर एक्स्प्रेस दाेन दिवसनांदेड - पनवेल एक्स्प्रेस दरराेजकाेल्हापूर - नागपूर एक्स्प्रेस दाेन दिवसकाेल्हापूर - धनाबाद एक्स्प्रेस एक दिवसअमरावती - पुणे एक्स्प्रेस दाेन दिवसलातूर - यशवंतपूर एक्स्प्रेस तीन दिवससाेलापूर - तिरुपती एक्स्प्रेस आठवड्यातून एकदासाेलापूर-लातूर-मुंबई एक्स्प्रेस आठवड्यातून एकदपंढरपूर-निजामाबाद पॅसेंजर दरराेजमिरज-परळी पॅसेंजर दरराेज
साेलापूरच्या धर्तीवर इंटरसिटी सुरू करावी...साेलापूरच्या धर्तीवर लातूर ते पुणे इंटरसिटी रेल्वेसेवा सुरू करावी, अशी मागणी लातूरसह परिसरातील प्रवाशांची आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने प्रवाशांची हेळसांड हाेत आहे. लातुरातील पहाटे पाच वाजता निघालेली इंटरसिटी पुण्यात सकाळी ११ वाजता पाेहोचेल आणि सायंकाळी ५ वाजता पुण्यातून निघालेली इंटरसिटी लातुरात रात्री ११ वाजता पाेहचेल. यातून पुण्याला ये-जा करणाऱ्या प्रवाशांची साेय हाेणार आहे.