लातूर : येथील जिल्हा पाेलीस अधीक्षक कार्यालयात असलेल्या नियंत्रण कक्षाच्या १०० क्रमांकावर येणाऱ्या प्रत्येक काॅलची नाेंद डायरीवर घेतली जाते. दरदिन किमान तीन ते पाच फेक काॅल्स येत असल्याचीही नाेंद पाेलीस दप्तरी आहे. यातून पाेलीस कर्मचाऱ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पाेलीस नियंत्रण कक्षाला येणाऱ्या सर्वाधिक काॅल्समध्ये महिला छळाच्या काॅल्सचा अधिक समावेश आहे.
कंट्राेल रूम दक्ष...
लातूर येथील जिल्हा पाेलीस अधीक्षक कार्यालयातील कंट्राेल रूम २४ तास दक्ष आहे. येणाऱ्या प्रत्येक काॅलची नाेंद डायरीला घेतली जाते. त्यानंतर गरजेनुसार तक्रारदारांना मदत केली जाते. याेग्य ताे सल्लाही दिला जाताे. नागरिकांना कंट्राेल रूमचा २४ तास आधार आहे.
- निखिल पिंगळे, पाेलीस अधीक्षक, लातूर
सर्वाधिक काॅल्स महिला छळाचे...
पाेलीस अधीक्षक कार्यालयातील कंट्राेल रूमला दिवसभरात येणाऱ्या काॅल्समध्ये सर्वाधिक काॅल्स हे महिलांच्या छळाबाबतचे आहेत. या काॅल्सची तातडीने गंभीरपणे दखल घेतली जात असून, याेग्य ताे सल्ला, समुपदेशन केले जात आहे.
दरराेज किमान तीन ते पाच फेक काॅल्स...
लातूर येथील पाेलीस अधीक्षक कार्यालयातील कंट्राेल रूमला येणाऱ्या काॅल्समध्ये दरराेज किमान तीन ते पाच फेक काॅल्सचा समावेश आहे.
कंट्राेल रूमला येणाऱ्या प्रत्येक काॅलची खातरजमा केली जाते. त्यानंतर त्या तक्रारदाराला मदत केली जाते.
कंट्राेल रूमला येणाऱ्या काॅल्सची तपासणी केल्यानंतर फेक काॅल्सचा आकडा समाेर येताे. अशा स्थितीत पाेलीस कर्मचारी निर्णय घेतात.
फेक काॅल्सबाबत कारवाई करण्याची तरतूद आहे. चुकीची माहिती देत दिशाभूल केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल हाेताे.