नागरसोगा येथील वाघोली रस्ता वादात असून तो सोडविण्यासाठी ५ ते ६ वेळा चर्चा झाली आणि रस्त्याचा प्रश्न सोडविण्यात आला. परंतु, पावसाळ्यात वाहून येणाऱ्या पाण्याचा तिढा अद्याप कायम आहे. त्यामुळे ग्रामपंचायत आणि गावातील नागरिकांनी तहसीलदार, आ. अभिमन्यू पवार यांच्याकडे निवेदन देऊन रस्त्याचे पाणी नैसर्गिक प्रवाहाप्रमाणे सोडण्यासाठी विनंती केली होती. सध्या या रस्त्याचे काम लोकसहभागातून होत आहे. रस्त्याच्या एका बाजूने नाली खोदल्याने सोमवारी झालेल्या पावसाचे सर्व पाणी वस्तीत आले आणि नागरिकांची तारांबळ उडाली. नैसर्गिक पाणी प्रवाह वाघोली रस्त्यात सोडल्यामुळे हे पाणी वस्ती व बाजूच्या शेतकऱ्यांच्या पिकांत जात आहे.
वाघोली रस्त्यावर दावतपूर व नागरसोगा शेत शिवारातील पावसाचे येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेत शिवारातील पाण्याची नैसर्गिक अथवा वहीवाटीने वाट काढावी, अशी मागणी होत आहे.
माझ्या शेतात वाघोली रस्त्याचे पाणी आले. त्यामुळे माझे आणि शेजारील पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे प्रशासनाने जेथून नैसर्गिक प्रवाह होता त्यानुसार पाणी काढून द्यावे, अशी मागणी होत आहे.