शेतक-यांच्या पिकाला भाव नाही, महाराष्ट्रात अस्थिर परिस्थिती - अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 01:17 PM2018-01-19T13:17:29+5:302018-01-19T13:21:40+5:30
जातीयवादी पक्ष स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी दोन समाजामध्ये अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला.
लातूर - जातीयवादी पक्ष स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी दोन समाजामध्ये अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला. आज महाराष्ट्रात अस्थिर परिस्थिती असून ती बदलण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल. भाजप सरकार दिशाभूल करणारं सरकार असल्याचा आरोप त्यांनी केला. ते लातूरमध्ये बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल यात्रा लातूरात पोहोचली आहे. आज समाजातील प्रत्येक घटक सरकारवर नाराज असल्याचा त्यांनी दावा केला. शेतक-यांच्या ऊस, सोयाबीन कुठल्याही पिकाला भाव नाही अशी स्थिती आहे. शेतकरी कर्जमाफीवरुन त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. आज महाराष्ट्रात लाखो तरुण बरोजगार आहेत असे ते म्हणाले.