कृषी कायदे मागे घेण्याबरोबरच एमएसपीला कायदेशीर परवानगी देण्यात यावी, डिझेलचे अर्धे दर कमी करून कृषी कायदे मागे घेण्यात यावेत, कायदे मागे घेण्यासाठी विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे आदी मागण्या लातूर येथे झालेल्या आंदोलनात करण्यात आल्या. आंदोलनात ॲड. उदय गवारे, ॲड.विजय जाधव, सुधाकर शिंदे, ॲड. मातोळकर, एकनाथ कवठेकर, विश्वंभर भोसले, श्रीनिवास बगदुरे, बी. टी. देशमुख,माणिक गायकवाड, दत्ता पवार, स्वप्नील खानापुरे, रामराव गवळी, मोहसिन खान, सतीश देशमुख, बाळ होळीकर,अभिजीत गणापुरे आदींची उपस्थिती होती.
बेकायदेशीर कृषी कायदे मागे घ्या...
केंद्र शासनाने बहुमताच्या जोरावर बेकायदेशीर कृषी कायदे मंजूर केले. मात्र हे कायदे शेतकऱ्यांच्या विरोधी आहेत. कामगारांच्या हिताआड येणारे कायदे आहेत. त्यामुळे विशेष अधिवेशन बोलावून सदरील कायदे मागे घेण्यात यावेत. एमएसपीला कायदेशीर परवानगी देण्यासाठी स्वामिनाथन फार्मुला अमलात आणावा अशी मागणीही आंदोलकांच्या वतीने करण्यात आली. आंदोलनात विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दिल्ली येथील आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी झालेल्या निदर्शने आंदोलनामध्ये केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.
आंदोलन दरम्यान ॲड. उदय गवारे ॲड. विजय जाधव सुधाकर शिंदे, विश्वंभर भोसले आदींनी मनोगत व्यक्त केले. केंद्र शासनाच्या धोरणाविरुद्ध सडकून टीका केली. जोपर्यंत कायदे मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.