निवळी येथील विलास सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी चेअरम वैशालीताई विलासराव देशमुख होत्या. यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन श्रीपतराव काकडे, माजी आमदार वैजनाथ शिंदे, श्रीशैल्य उटगे, सर्जेराव मोरे, गणपतराव बाजूळगे, पृथ्वीराज सिरसाट उपस्थित होते.
पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले, सहकारी साखर कारखाने चालवित असताना संचालक मंडळाने कारखान्याचे रुपांतर बायोरिफायनरीमध्ये केले पाहीजे. यातून अनेक पदार्थाची निर्मीती होवून मिळकत व्हावी याचा फायदा शेतकऱ्यास व्हावा. सध्या वीज वितरणाबाबत तक्रारी येत आहेत, त्याचे निरसर करण्यासाठी उर्जामंत्र्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ.
प्रारंभी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यकारी संचालक ए. आर. पवार यांनी सभेचे वाचन केले. कारखान्याचे उपाध्यक्ष रविंद्र काळे यांनी वार्षीक अहवाल सादर केला तर त्यास संचालक गाेविंद डुरे यांनी अनुमोदन दिले. या अहवालास सर्वानोमते टाळयांच्या गजरात अनुमती दिली. सर्वसाधारण सभेस ॲड.व्यंकट बेद्रे, व्ही.पी.पाटील, अनंत देशमुख, मनोज पाटील, हरीराम कुलकर्णी सह विलास सहकारी साखर कारखान्याचे संचालक, सभासद, शेतकरी सामाजीक अंतर बाळगून उपस्थित होते. सूत्रसंचालन राहूल इंगळे तर आभार संचालक युवराज जाधव यांनी व्यक्त केले.