उन्ह वाढले तरी...
यंदा एप्रिल महिन्यात जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती. त्यामुळे मे महिन्यात काय होणार अशी चिंता जिल्हावासीयांना सतावित होती. कारण या कालावधीत मनरेगाची कामे सुरु असतात. यासाठी ग्रामीण भागातील मजूर वर्ग रोजगारासाठी बाहेर जात असतो. दिवसभर उन्ह अंगावर घेवून काम करतो. मात्र यंदा एप्रिल महिन्यापासून लॉकडाऊन असल्याने ही सर्व कामे बंद असल्याने वाढत्या तापमानाचा फारसा परिणाम झाला नाही.
उष्माघाताने एकही मृत्यू नाही...
कोरोनामुळे उन्हाळा घरातच कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता ब्रेक द चेन अंतर्गत मागील महिनाभरापासून लॉकडाऊन आहे. त्यामुळे उद्योगधंदे व सर्वच व्यवहार ठप्प आहे. तर नागरिकांना बाहेर फिरण्यास निर्बंध लागू करण्यात आले. त्यामुळे मागील वर्षी प्रमाणेच यंदाचा उन्हाळा देखील जिल्हावासीयांना घरात घालवावा लागला आहे. त्यामुळे ना उन्हाची समस्या व उष्माघाताचा त्रास झाला नाही. तर यंदा अवकाळी पाऊस अधून मधून हजेरी लावत असल्याने मे महिन्यात सुध्दा तापमान ४० अंश सेल्सिअसच्या खालीच होते.
तीन वर्षातील उष्माघाताचे बळी
२०१९ - ००
२०२० - ००
२०२१ - ००
गेल्या तीन वर्षात जिल्ह्यात उष्माघाताने एकही मृत्यू झालेला नाही. आरोग्य विभागाच्या वतीने सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावर याबाबत उष्माघात तसेच इतर साथरोगासाठी योग्य त्या सुचना करण्यात आल्या आहेत. दरम्यान, मागील वर्षी आणि या वर्षी उन्हाळ्यात लॉकडाऊन असल्याने अनेक कामे बंद होती. त्यामुळे मजूर, कामगार बाहेर पडलेले नाहीत. - डॉ. श्रीकांत कुलकर्णी, आरोग्य विभाग, लातूर