शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

लातूर झेडपी सीईओंच्या कार्यवाहीची धास्ती; ग्रामपंचायत सदस्यांची प्रशिक्षणास उपस्थिती

By हरी मोकाशे | Published: June 10, 2023 6:26 PM

राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानअंतर्गत ८ ते १० जून या कालावधीत मुरूडच्या पंचायत राज प्रशिक्षण केंद्राच्या वतीने ग्रामपंचायत सदस्यांसाठी प्रशिक्षण झाले.

लातूर : ग्रामपंचायतीच्या सदस्यांना ग्रामपंचायत कारभाराची माहिती व्हावी म्हणून मुरूडच्या पंचायत राज प्रशिक्षण केंद्राच्या वतीने गुरुवारपासून प्रशिक्षण सुरू आहे. पहिल्या दिवशी २५० पैकी २१० सदस्य अनुपस्थित असल्याचे आढळल्याचे दिसून आल्याने जिल्हा परिषदेच्या सीईओंनी तीव्र नाराजी व्यक्त करीत तात्काळ नोटीस बजावण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना दिले होते. त्यामुळे सदस्यांनी धास्तीच घेतली. तिसऱ्या दिवशी शनिवारी १८७ जण उपस्थित राहिले.

ग्रामपंचायतीचा कारभार कसा करावा. मासिक, ग्रामसभा घेऊन त्यात विकासात्मक बाबींवर चर्चा करून निर्णय कसे घ्यावेत. ग्रामपंचायत सदस्यांना अधिकार कोणते, त्यांची कर्तव्ये काेणती अशा विविध बाबींची माहिती होण्यासाठी राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानअंतर्गत ८ ते १० जून या कालावधीत मुरूडच्या पंचायत राज प्रशिक्षण केंद्राच्या वतीने ग्रामपंचायत सदस्यांसाठी प्रशिक्षण झाले.

तीनदिवसीय प्रशिक्षणास लातूर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींचे २५० ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र, गुरुवारी पहिल्या दिवशी केवळ ४० सदस्य उपस्थित असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गाेयल यांच्या पाहणीत आढळले. त्यामुळे सीईओंनी गांभीर्याने दखल घेत गैरहजर सदस्यांना नोटीस बजावून प्रशिक्षणावरील खर्च वसूल करण्याबरोबरच त्यांच्यावर अपात्रतेची कार्यवाही करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश लातूरच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले होते.

खुलासे, पुरावे सादर न केल्यास कार्यवाही...प्रशिक्षणास गुरुवारी २१०, शुक्रवारी ९०, तर शनिवारी ६३ ग्रामपंचायत सदस्य गैरहजर राहिल्याचे आढळून आले. सीईओंच्या आदेशामुळे प्रशिक्षणास सदस्यांची उपस्थिती वाढली आहे. गैरहजर सदस्यांकडून खुलासे घेऊन पुरावे तपासण्यात येणार आहेत. त्यात तथ्य आढळून न आल्यास कार्यवाही केली जाणार आहे.- दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत

टॅग्स :laturलातूरgram panchayatग्राम पंचायत