लातूर : मी बॅकेतून बाेलत आहे असे सांगत तमुचे खाते अपडेट करायचे आहे, या लिंकवर माहिती भरा असे म्हणून एका व्यक्तीने माेबाईलवरुन ६२ हजार ६६ रुपये ३२ पैशांना गंडविल्याची घटना अहमदपूर येथे घडली. याबाबत अहमदपूर पाेलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविराेधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी वसंत व्यंकटराव घाेगरे (वय ४५ रा. विवेकानंद काॅलनी, महात्मा गांधी महाविद्यालयाच्या पाठीमागे, अहमदपूर) यांना २६ ऑगस्ट राेजी एका माेबाईलवर अज्ञात व्यक्तीने काॅल केला. दरम्यान, मी बॅकेतून बाेलत आहे, तुमचे बॅक खाते अपडेट करायचे आहे असे सांगितले. फिर्यादीने या काॅलवर आणि बाेलण्यावर विश्वास ठेवला. पाठविलेल्या लिंकवर तुम्ही क्रेडिट कार्डची माहिती भरण्याचा सल्ला दिला. अज्ञाताने सांगितल्याप्रमाणे फिर्यादीने ही माहिती लिंकवर क्लिक करुन भरली.
दरम्यान, काही क्षणातच एसबीआय बॅक क्रेडिट कार्डावरुन ६२ हजार ६६ रुपये ३२ पैसे परस्पर काढून घेतले. अचानक बॅक खात्यातून पैसे वजा झाल्याने त्यांनी अधिक चाैकशी केली असता, अज्ञात व्यक्तीने फसविल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत अहमदपूर पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञाताविराेधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस निरीक्षक कामठेवाड करत आहेत.
अनाेळखी काॅलला प्रतिसाद देवू नका...
आपल्या माेबाईलवर येणाऱ्या अनाेळखी काॅलला प्रतिसाद देवू नये. विशेष म्हणजे मी बॅकेतून बाेलत आहे, अशी बतावणी करुन बॅक खात्याची अधिक तपशीलवार माहिती मागितली तर ती अजिबात देवू नका. बॅक अशी माहिती माेबाईलवर मागत नाही. नकाे त्या लिंकवर क्लिक करु नका आणि अॅपही डाउनलाेड करु नका. केवळ दक्षता बळगणे हेच फसवणुकीवर एकमेव पर्याय आहे. फसवणूक झाल्यास तातडीने पाेलिसात तक्रार करावी. - निखिल पिंगळे, पाेलीस अधीक्षक, लातूर