लातूर : आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील आमदार टी. राजासिंग यांच्याविराेधात लातुरातील शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात मंगळवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, १९ फेब्रुवारी राेजी लातुरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या माेटारसायल रॅलीचा समाराेप छत्रपती शिवाजी महाराज चाैकात झाला. दरम्यान, समाराेप कार्यक्रमात तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील आमदार टी. राजासिंग लाेध यांनी आक्षेपार्ह भाषण केले. दरम्यान, या प्रकरणी विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली हाेती. याबाबत सहायक संचालक व सरकारी अभियाेक्ता संचालनालयाचा अभिप्राय साेमवारी प्राप्त झाला. जातीय, धार्मिक तेढ निर्माण हाेईल, राष्ट्रीय एकात्मतेला बाधा हाेईल, असे वक्तव्य केल्याचे अभिप्रायात म्हटले आहे.
याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात पाेलिस उपनिरीक्षक पंकज नीळकंठे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आमदार टी. राजासिंग लाेध यांच्याविराेधात गु.र.नं. ९० / २०२३ कलम १५३ (अ), १५३ (ब), २९५ (अ), ५०५ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पाेलिस निरीक्षक विशाल शहाणे करीत आहेत.