शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

अखेर उदगीरचा शासकीय दूध भुकटी प्रकल्प भंगारात !

By संदीप शिंदे | Published: July 01, 2024 6:54 PM

शासकीय स्तरावरील निविदा प्रक्रिया पूर्ण : मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी १९७८ मध्ये उदगीर येथील शासकीय दूध भुकटी प्रकल्पाचे भूमिपूजन केले. १९ जानेवारी १९७९ या वर्षी तो सुरू झाला.

- विनायक चाकुरेउदगीर : तालुक्याचे वैभव असलेल्या शासकीय दूध भुकटी प्रकल्प आता भंगारात निघाला आहे. शासकीय स्तरावरून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, संभाजीनगर येथील विभागीय कार्यालयाने उच्चतम दराने निविदा भरलेल्या संस्थेच्या नावाने प्रशासकीय मान्यतेसाठी मंत्रालयात प्रस्ताव पाठवल्याची माहिती आहे. यापूर्वी दूध डेअरी बचाव समितीने हा प्रकल्प ‘एनडीडीबी’कडे चालवण्यासाठी द्यावा, यासाठी प्रयत्न केले होते. डिसेंबर महिन्यात या पथकाने प्रकल्पाची पाहणी केली होती. आता हा प्रकल्प भंगारात गेल्यामुळे या ठिकाणी पुन्हा नवीन प्रकल्प होणार की १४ एकरचा भूखंड रिकामा राहणार याकडे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी १९७८ मध्ये उदगीर येथील शासकीय दूध भुकटी प्रकल्पाचे भूमिपूजन केले. १९ जानेवारी १९७९ या वर्षी तो सुरू झाला. जून २००२ पर्यंत हा प्रकल्प सुरू होता. त्यानंतर या ना त्या कारणांनी तो बंद पडला. नोव्हेंबर २००८ मध्ये तत्कालीन आ. चंद्रशेखर भोसले यांच्या पाठपुराव्याने मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन केले. मात्र, त्यानंतर पुन्हा बंद पडला तो अद्यापपर्यंत.

उदगीरच्या दूध भुकटी प्रकल्पाची क्षमता ही दररोज १ लाख २० हजार लिटर दुधावर प्रक्रिया करण्याची होती. मलईविरहित दूध भुकटी ११.७ टन, तर पांढरे लोणी ५ टन उदगीर दूध भुकटी प्रकल्पाच्या ६० किलोमीटर परिसरातील अंबाजोगाई, गंगाखेड, भूम, परंडा, कळंब, अहमदपूर, लोहा, निलंगा, परभणी, धाराशिव, उमरगा आदी ठिकाणचे कच्चे थंड केलेले दूध भुकटी प्रकल्पासाठी येत होते. दूध भुकटी प्रकल्पातून तयार झालेली दूध भुकटी व पांढरे लोणी देशात अनेक भागांत विकले जात होते व यातून राज्य शासनास चांगला उत्पन्न मिळत होते. सुरुवातीला या प्रकल्पात ५३५ कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष रोजगार मिळत होता. तर या भागातील हजारो शेतकऱ्यांना शेतीपूरक म्हणून दूध उत्पादनाद्वारे उत्पन्नाचे साधन निर्माण झाले होते. २४ वर्षे हा प्रकल्प उत्तमरीत्या चालून शेवटी जो बंद पडला तो आजपर्यंत पुन्हा सुरू झालाच नाही.

भंगार गेल्यावर इमारत जमीनदोस्त होणार...माजी खा. सुधाकर शृंगारे यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांच्या उपस्थितीमध्ये २९ जानेवारी रोजी दूध डेअरीच्या प्रांगणात शेतकरी संवाद मेळावा घेऊन या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत डेअरीचे पुनरुज्जीवित करण्याची घोषणा केली होती. बरोबर एक महिन्यानंतर २९ फेब्रुवारी रोजी हा प्रकल्प आहे त्या परिस्थितीमध्ये भंगारात विकण्याची निविदा शासनाने प्रसिद्ध केली आहे. आता या ठिकाणचे भंगार गेल्यानंतर सदरील इमारत जमीनदोस्त करण्यात येईल, यानंतरच केंद्र सरकार व राज्य सरकारकडे पाठपुरावा केला तरच नवीन प्रकल्प उभा राहू शकतो.

नव्याने प्रकल्प सुरू होण्यासाठी प्रयत्न...उदगीर मतदारसंघाचे आमदार तथा क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्यासोबत दूध डेअरी बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री, दुग्ध विकासमंत्री यांची भेट घेऊन हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याची विनंती केली होती. तसेच केंद्रीय दुग्धविकास मंत्र्याकडे पाठपुरावा करून हा प्रकल्प सुरू करण्याची मागणी केली. सदरील प्रकल्पाची ‘एनडीडीबी’मार्फत पाहणी करून या ठिकाणी नव्याने प्रकल्प सुरू करण्याचे प्रयत्न केले होते.

आता नागरिकांच्या नजरा ‘एनडीडीबी’कडे...अनेक शासकीय दूध योजनेचे प्रकल्प भंगारात निघाले आहे. उदगीर येथील दूध योजना व दूध भुकटी प्रकल्पाची मशिनरी नव्याने उभी करण्यासाठी ‘एनडीडीबी’शिवाय पर्याय नसल्याने येणाऱ्या काळात ‘एनडीडीबी’ काय भूमिका घेते, यावर या प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून आहे. दूध भुकटी प्रकल्प भंगारात निघण्याची निविदा पूर्ण झाली असली, तरी प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी क्रीडामंत्री संजय बनसोडे व खा. डॉ. शिवाजी काळगे यांच्यामार्फत ‘एनडीडीबी’कडे पाठपुरावा करू, असे समितीचे निमंत्रक मोतीलाल डोईजोडे यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरmilkदूध