शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

सारे प्रयत्न अपुरे पडले, अखेर उदगीरचा शासकीय दूध भुकटी प्रकल्प भंगारात !

By संदीप शिंदे | Published: September 10, 2024 8:06 PM

१ कोटी रुपयांना कोल्हापूर येथील खाजगी कंपनीला मिळाली निविदा

उदगीर : येथील शासकीय दूध भुकटी प्रकल्प भंगारात निघाला असून, शासकीय स्तरावरून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कार्यालयाने उच्चतम दराने निविदा भरलेल्या कोल्हापूर येथील खाजगी कंपनीची १ कोटी १ लाख १४ रुपयांची निविदा मंजूर झाली असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांनी दिली.

संबंधित कंपनीचे कर्मचारी मंगळवारी प्रकल्पात मशिनरी नेण्यास दाखल झाले आहे. ही बाब शासकीय दूध योजना पुनर्जीवन समितीच्या पदाधिकाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी प्रकल्पात कंपनीच्या कर्मचाऱ्यांना भंगार घेऊ जाऊ नका असे निवेदन दिले. तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी १९७८ मध्ये उदगीर येथील शासकीय दूध भुकटी प्रकल्पाचे भूमिपूजन केले. १९ जानेवारी १९७९ साली प्रकल्प सुरू झाला. जून २००२ पर्यंत हा प्रकल्प सुरू होता. नोव्हेंबर २००८ मध्ये तत्कालीन आ. चंद्रशेखर भोसले यांच्या पाठपुराव्याने मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन केले. मात्र, त्यानंतर पुन्हा बंद पडला. उदगीरच्या दूध भुकटी प्रकल्पाची क्षमताही दररोज १ लाख २० हजार लिटर दुधावर प्रक्रिया करण्याची होती. मलई विरहित दूध, भुकटी ११.७ टन, तर पांढरे लोणी ५ टन प्रकल्पाच्या ६० किलोमीटर परिसरातील अंबाजोगाई, गंगाखेड, भुम, परंडा, कळंब, अहमदपूर, लोहा, निलंगा, परभणी, धाराशिव, उमरगा आदी ठिकाणचे कच्चे थंड केलेले दूध भुकटी प्रकल्पासाठी येत होते. या प्रकल्पात ५३५ कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष रोजगार मिळत होता.

माजी खासदार, विद्यमान मंत्र्यांचे प्रयत्न अपुरे...माजी खा. सुधाकर शृंगारे यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांच्या उपस्थितीत डेअरीच्या प्रांगणात संवाद मेळावा घेऊन डेअरीचे पुनर्जीवित करण्याची घोषणा केली होती. बरोबर एक महिन्यानंतर हा प्रकल्प आहे, त्या परिस्थितीमध्ये भंगारात विकण्याची निविदा शासनाने प्रसिद्ध केली. आता कंपनी येथील सर्व मशिनरीचे भंगार गेल्यानंतर इमारत जमीनदोस्त करणार असून,यानंतरच केंद्र सरकार व राज्य सरकारकडे पाठपुरावा केला तरच नवीन प्रकल्प उभा राहू शकतो.

केंद्रीय मंत्री ललन सिंह यांच्याकडे पाठपुरावा...याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी आर.बी. मते म्हणाले, प्रकल्पातील भंगाराची किंमत १ कोटी १ लाख १४ हजार रुपये एवढी निविदा उच्चतम दराने भरलेल्या कोल्हापूर येथील कंपनीची प्राप्त झाली. तसेच मंगळवारी शहरातील काही नागरिकांनी येथील भंगार नेऊ नका म्हणून संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सांगितले असल्याने सध्या भंगार काढण्याचे काम स्थगित झाले आहे. याबाबत शासनाकडे अहवाल पाठवून शासनाचा अभिप्राय मागवून त्यानुसारच पुढील कारवाई करण्यात येईल.

नवीन प्रकल्प मंजूरीशिवाय मशिनरी नेऊ नका...शासकीय दूध भुकटी प्रकल्पाच्या जागेत राज्य शासनाने पुढाकार घेऊन केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून जोपर्यंत नवीन प्रकल्प याठिकाणी मंजूर होत नाही तोपर्यंत येथील कुठलीही मशिनरी आम्ही जाऊ देणार नाही, असे शासकीय दूध योजना पुनर्जीवन समितीचे मोतीलाल डोईजोडे यांनी सांगितले. दरम्यान समितीच्या वतीने सोमवारी प्रशासनास निवेदन देण्यात आले. तसेच मंगळवारी मशीनरी नेण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

टॅग्स :laturलातूरmilkदूधState Governmentराज्य सरकार