शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्टिकल 370 वरून जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ, हाणामारी अन् पोस्टरही फाडलं; बघा VIDEO
2
"उद्धवजी नेता घरात नाही, तर लोकांच्या दारात शोभून दिसतो"; बावनकुळेंनी ठाकरेंना डिवचलं
3
“महाराष्ट्राला परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार
4
"अमेरिकन जनतेसाठी कमला हॅरिस चॅम्पियन आहेत, कायम राहतील"; जो बायडेन यांनी केलं कौतुक
5
"जिवंत राहिले तर आवश्य कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
6
"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं
7
राज ठाकरेंच्या मनसेला आम्ही ऑफर दिली होती, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा
8
ऑस्ट्रेलियात Dhruv Jurel नं राखली लाज; संघ अडचणीत असताना हा पठ्ठ्या एकटा लढला!
9
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
10
"तुला जीवाची पर्वा आहे की नाही?”; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने फॅशन डिझायनरला धमकी
11
शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...
12
Guruwar Astro Tips: कार्तिक महिन्यातला पहिला गुरुवार; झपाट्याने प्रगतीसाठी करा 'हे' चार उपाय!
13
भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!
14
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
15
आधी आरोप, मग अजित पवारांना पवित्र करून घेतले, जयंत पाटील यांचे टीकास्र
16
"मला धमक्या मिळत आहेत...", विक्रांत मेस्सीचा खुलासा; 'द साबरमती रिपोर्ट' ठरलं कारण?
17
अशोक सराफ यांच्या नवीन मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला
18
WI vs ENG: कार्टीच्या विक्रमी सेंच्युरीच्या जोरावर कॅरेबियन संघाची मालिका विजयाची 'पार्टी'
19
"राहुल गांधींनी नागपुरात कोरं संविधान दाखवलं तर मुंबईत..., बाबासाहेबांचा 'हा' अपमान..."; VIDEO शेअर करत भाजपचा हल्लाबोल
20
भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही

लातूरात किराणा होलसेल दुकानाला आग; ३० ते ३५ लाखांच्या सामानाची राख

By हणमंत गायकवाड | Published: February 20, 2024 5:50 PM

अग्निशमन दलाच्या पथकाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न

लातूर: शहरातील एक नंबर चौकात मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास रुद्र होलसेल किराणा दुकानाला अचानक आग लागली. या आगीत अंदाजे ३० ते ३५ लाखांचे नुकसान झाले आहे. फर्निचर,टीव्ही, फ्रीज, सीसीटीव्ही कॅमेरे तसेच किराणा वस्तू जळून खाक झाल्या आहेत. आग कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकले नाही. दरम्यान,अग्निशमन दलाच्या चार बंबद्वारे आग आटोक्यात आणण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर आग आटोक्यात आली.

बार्शी रोडवरील एक नंबर चौकात असलेल्या हॉटेल साई इंटरनॅशनलच्या इमारतीत असलेल्या रुद्र किराणा होलसेल दुकानाला मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीचा भडका इतका मोठा होता की मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन मोठी गर्दी केली होती. अग्निशमन दलाला लागल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर पहाटे पाच वाजून २१ मिनिटांनी अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली. लागलीच दुसरी गाडी आली. अशा एकूण चार बमद्वारे अग्निशमन दलाच्या जवानांनी अग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत किराणा दुकानातील फर्निचर, टीव्ही, फ्रीज, सीसीटीव्ही कॅमेरे, किराणा वस्तू,होलसेल साहित्य जळून खाक झाले. अंदाजे  ३० ते ३५ लाखाचे नुकसान झाले असल्याचा अंदाज वरती येण्यात आला आहे. ही आग शॉर्टसर्किटमध्ये लागली असावी असा अंदाज आहे. मात्र नेमके कारण समजलेले नाही.

अग्निशमन दल घटनास्थळी;मोठा अनर्थ टळला...आग लागलेल्या रुद्र होलसेल किराणा दुकानाच्या शेजारी अन्य दोन किराणा दुकान आहेत तर बाजूला याच बिल्डिंगमध्ये हॉटेल साई इंटरनॅशनल आहे तर तळमजल्यामध्ये एका बँकेची शाखा आहे. मोठ्या कॉम्प्लेक्स मध्ये हे दुकान असून मोठे हॉटेल आहे अग्निशमन दलाच्या गाड्या लवकर येऊन आग आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

अग्निशमन दलाचे चार बंबने आग आटोक्यात...दरम्यान अग्निशमन दलाचे आनंद कांबळे, पवन शिंदे, रवी भोसले,महबूब शेख, मोहसीन शेख, संदीप रणखांब, एम.ए. बोणे, रामेश्वर जाधव, बाळासाहेब जाधव, हसन शेख, कृष्णा दिवे यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी परिश्रम घेतले.

टॅग्स :laturलातूरfireआग