शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
2
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
3
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
4
'जानी दुश्मन'चा खेळ खल्लास! बुमराह-विराट यांच्यात दिसला 'मिले सुर मेरा तुम्हारा सीन' (VIDEO)
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
6
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
7
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
8
बँक खातेदारांना आता ४ नॉमिनी व्यक्तींची नावं द्यावी लागणार, सरकार लवकरच कायदा आणणार!
9
NTPC चा शेअर तुम्हाला अलॉट झालाय का? कसं चेक कराल, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर
10
'कांतारा'च्या कलाकारांसोबत मोठी दुर्घटना! शूटिंगवरुन परतताना बस पलटी, अनेक जण जखमी
11
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
12
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
13
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
14
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
15
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
16
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
17
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
18
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
19
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
20
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला

शहरातील ७५ खासगी रुग्णालयांना अग्निशमन दलाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 4:48 AM

लातूर : लातूर शहरात महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडे नोंद केलेल्या रुग्णालयांची संख्या १६५ आहे. यातील फक्त ८७ रुग्णालयांनी महानगर पालिकेच्या ...

लातूर : लातूर शहरात महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडे नोंद केलेल्या रुग्णालयांची संख्या १६५ आहे. यातील फक्त ८७ रुग्णालयांनी महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र घेतले आहे. उर्वरित ७५ रुग्णालयांनी ना हरकत प्रमाणपत्र घेतले नाही. त्यामुळे या रुग्णालयांना अग्निशमन दलाने नोटिसा पाठविल्या आहेत. तत्काळ एनओसी घ्या, अन्यथा रुग्णालयाची आमच्याकडे केलेली नोंदणी रद्द केली जाईल, असेही या नोटिशीत म्हटले आहे.

भंडारा येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, तसेच आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. शासकीय रुग्णालयाचे फायर, स्थापत्य आणि इलेक्ट्रिकल ऑडिट करण्यावर भर दिला जात आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्वच रुग्णालयाचे गेल्या दोन दिवसांपासून ऑडिट करण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयाचे ऑडिट करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने शहरातील खासगी रुग्णालयांना एनओसी घेण्याबाबत सूचित केले आहे. आग प्रतिबंधक कायदा २००६ नुसार रुग्णालयामध्ये अग्निशमन दलाच्या सर्व यंत्रणा असणे बंधनकारक आहे. त्याला खासगी रुग्णालये अपवाद नाहीत. त्यामुळे या रुग्णालयाकडे अग्निशमन दलाची एनओसी आहे की नाही, याची तपासणी केली जात आहे. लातूर शहरांमध्ये खासगी रुग्णालयांची संख्या २००च्या घरात आहे. त्यापैकी १६५ रुग्णालयांनी अग्निशमन दलाच्या कार्यालयात नोंदणी केलेली आहे. यातील ८७ रुग्णालयांनी ना हरकत प्रमाणपत्र घेतले आहे. उर्वरित ७५ रुग्णालयाने अध्याप ना हरकत प्रमाणपत्र घेतले नाही. त्यामुळे या रुग्णालयांना ना हरकत प्रमाणपत्र घेण्याबाबत नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. ना हरकत प्रमाणपत्र न घेतल्यास रुग्णालयाची बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार झालेली नोंदणी रद्द करण्यात येईल, असेही या नोटिशीत म्हटले आहे.

३३ खासगी रुग्णालयांनी घेतले नूतनीकरण प्रमाणपत्र...

दर तीन वर्षांनी नूतनीकरण प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. या नियमाचे पालन फक्त ३३ खासगी रुग्णांना यांनी केले आहे. ५४ रुग्णालयांनी नूतनीकरण प्रमाणपत्र घेण्यास दुर्लक्ष केले आहे. राज्यात घडणाऱ्या दुर्घटनेबाबत गांभीर्य ओळखून अत्यावश्यक उपाययोजना करणे आवश्यक आहे. मात्र, त्याकडे खासगी रुग्णालयांचेही दुर्लक्षच आहे. ना हरकत आणि नोंदणी नूतनीकरण घेण्याबाबत वारंवार सूचना करूनही त्याकडे रुग्णालयांचे दुर्लक्ष असल्याचे मनपाच्या अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले.

परत नोटिसा पाठविणार

शहरात अंदाजे दोनशेपेक्षा अधिक खासगी रुग्णालयांची संख्या आहे. यापैकी १६५ रुग्णालयांची आमच्याकडे नोंद आहे. फक्त ८७ रुग्णालयाने या वर्षी घेतली आहे. तीन रुग्णालयांकडे तात्पुरती एनओसी आहे. ७५ रुग्णालयाकडे अध्याप एनओसी नाही. या सर्व रुग्णालयांना नोटिसा पाठविण्यात आले आहेत. अग्निशमन दलाच्या नियम व अटीनुसार रुग्णालयात अग्निशमन यंत्रणा उभी करावी, असे या नोटिशीत म्हटले आहे. नोंदणी प्रमाणपत्र घेण्याचेही सूचित केले आहे. परत नोटिसा पाठविल्या जातील.

शेख अग्निशमन अधिकारी लातूर मनपा