उदगीर (जि. लातूर) : तालुक्यातील सुमठाणा येथील नदीपात्रात वाळू उपसा सुरु हाेता. दरम्यान, सोमवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास वाढवणा पोलिसांच्या पथकाने अचानक छापा मारला. यावेळी एका जेसीबीसह तब्बल २४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर पाच लणांना अटक केली आहे. याबाबत वाढवणा बु. पाेलीस ठाण्यात अवैध वाळू उपसाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, उदगीर तालुक्यातील सुमठाणा परिसरातून वाहणाऱ्या नदीपात्रामधील गौण खनिजाचे अलिकडे माेठ्या प्रमाणावर उत्खनन सुरु हाेते. या उत्खननासाठी कोणताही परवाना नसून, ताे अवैध, चाेरट्या मार्गाने वाहतूक केली जात आहे. काही वाळू माफियांनी नदीपात्रातील वाळूचा उपसा रात्रं-दिन करतर असून, यातून शासनाचा लाखा रुपयांचा महसूल बुडवत असल्याचे समाेर आले आहे. साेमवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास वाढवणा ठाण्याच्या पाेलीस पथकाने नदीपत्रात छापा मारुन ही कारवाई केली. यावेळी एक जेसीबीसह ट्रॅक्टर, हेड, ट्राली, नदीपात्रातून उसण्यात आलेली वाळू, लोखंडी चाळणी आणि मोबाईल असा एकूण २३ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत वाढवणा पाेलीस ठाण्यात बालाजी अशोक मंगनाळे, अंतेश्वर माधव किवंडे, शिवा माणिक कांबळे, ज्ञानोबा विश्वनाथ तलवाडे (सर्व रा. सुमठाणा ता. उदगीर), सलाउद्दीन शौकत अली (रा. हटवाल जि . टोटरी, उत्तर प्रदेश) यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पाचही आराेपींना पाेलिसांनी अटक केली आहे. अशी माहिती वाढवणा पोलीसांनी दिली. तपास पोहेकॉ. शिवाजी सोनवणे करत आहेत.