इनरव्हील क्लब व रोटरी क्लबच्या वतीने ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मेजर नलवाड, गोविंद दहिफळे, सूर्यकांत दहिफळे, प्रल्हाद केंद्रे, शुक्राचार्य मुंडे, ज्ञानोबा मोरे या माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी क्लबच्या अध्यक्षा डॉ. मीनाक्षी करकनाळे, सचिव डॉ. भाग्यश्री येलमटे, उपाध्यक्षा डॉ. वर्षा भोसले, ॲड. ज्योती काळे, वैशाली चामे, डॉ. सुप्रिया जगताप, मंजुषा फुलारी, मीना भुतडा, कलावती भातांब्रे, सुनीता गुणाले, डॉ. अनिता शिंदे, डॉ. मनकर्णा चिवडे, वृषाली चवळे, प्रतिभा हंगरगे, शैलजा सांगवीकर उपस्थित होत्या.
शहरातील भाजपा कार्यालयात सेवानिवृत्त मुख्याध्यापक देवेंद्र देवणीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी माजी मंत्री विनायकराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी २५ माजी सैनिक, गोविंद गिरी, ज्ञानोबा बडगिरे, डॉ. सिद्धार्थकमार सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आ. बब्रुवान खंदाडे, माजी सभापती ॲड. आर. डी. शेळके, बाबुराव बावचकर, चंद्रशेखर डांगे, शरद जोशी, ज्ञानोबा बडगिरे, लक्ष्मीकांत कासनाळे, राहुल शिवपुजे, अमित रेड्डी, राम बेल्लाळे, देवानंद मुळे, राजकुमार खंदाडे, कमलाकर पाटील, नीळकंठ पाटील, नागेश भुतडा, इतिराज केंद्रे, अतुल रेड्डी, लक्ष्मण खंदाडे, प्रशांत जाभाडे, अमोल इरले, संगम कुमदळे, सुनील तत्तापुरे, राजू रेड्डी, संतोष गोरे आदी उपस्थित होते.
येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात संस्था सचिव प्राचार्या रेखाताई तरडे - हाके यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी श्रावणी भंडे, गार्गी नळेगावकर, नैतिक उगिले, तन्वी पस्तापुरे, प्रणव लद्दे, शुभम वागलगावे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक आशा रोडगे, मुख्याध्यापक उद्धव शृंगारे, ॲड. सलमान शेख, व्यंकटराव जायभाये, उगिले, लद्दे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक त्रिगुणा मोरगे यांनी केले. सूत्रसंचालन सतीश साबणे यांनी केले.
येथील बालाघाट तंत्रनिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी संचालक कुलदीप हाके, शिवलिकताई हाके, प्राचार्य डॉ. एन. पी. शिवपुजे, प्राचार्य एम. एन. आरदवाड, राजपाल बैकरे आदी उपस्थित होते.
अंधोरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात प्रदीप चौकटे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक चंद्रकांत सानप, पोउपनि. गजानन अन्सापुरे, बी. डी. बिराजदार, तलाठी दिगंबर मेडके, चंद्रकांत गोखरे, धनंजय वड्डे, वसंतराव क्षीरसागर, मनोज कांडणगिरे, माजी सरपंच भाग्यश्रीताई क्षीरसागर, अहिल्याताई चिल्केवार, प्रभावतीताई कांबळे, यशोदा कांबळे, नरवटवाडीचे नवनिर्वाचित सदस्य राम राठोड, गंगाधरराव कल्याणे, विठ्ठल मंगे, बापुराव देवळकर, माधवराव कल्याणे, यलबाजी नलवाड, त्रिमुख बने, चंद्रकांत डिगे, पवन येलणारे आदी उपस्थित होते.