शहरं
Join us  
Trending Stories
1
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
2
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
3
IPL 2025 GT vs DC : बटलर इज बॉस! दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत गुजरात टायटन्सनं रचला इतिहास
4
"देशात धार्मिक युद्ध भडकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार"; मर्यादेबाहेर जाताय म्हणत भाजप खासदाराची टीका
5
वाळूमाफियांची आता खैर नाही! नियमांचे उल्लंघन केल्यास थेट डेपो होणार रद्द, सर्वांना नोटीस जारी
6
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर मनसे नेते नाराज? म्हणाले, “त्यांनी आम्हाला दोनदा फसवलेय”
7
8व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; सरकार या 35 पदांवर करणार नवीन नियुक्त्या
8
IPL 2025 Video: भरमैदानात झाला राडा !! इशांत शर्मा भडकला, आशुतोषवर बोट रोखलं, नेमकं काय घडलं?
9
राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले...
10
Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
11
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी पदार्पणासह रचणार इतिहास; जाणून घ्या सविस्तर
12
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
14
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ
15
IPL 2025 Video: 'सुपरमॅन' कॅच! विपराजला हवा होता चौकार, पण जोस बलटरने हवेत उडत घेतला भन्नाट झेल
16
Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
17
“इथले मीठ खाता अन् मराठीला विरोध करता? हिंदीची सक्ती होऊ देणार नाही”; उद्धव ठाकरेंनी ठणकावले
18
IPL 2025: चेन्नई सुपर किंग्जमध्ये आला 'बेबी एबी'; अशी आहे टी२० कारकीर्द
19
“कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घ्यावी, ५ वर्षांनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल”: नाना पटोले

राज्यात प्रथमच लातूरच्या आठ आरोग्य उपकेंद्रांना राष्ट्रीय मानांकनाची मोहोर

By हरी मोकाशे | Updated: July 25, 2024 19:02 IST

एनक्यूएएसकडून मूल्यांकन, पारितोषिकापोटी तीन वर्षांत ५१ लाख ८४ हजारांचा निधी

लातूर : राष्ट्रीय पातळीवर आणि शासनाच्या आरोग्य विभागाच्या सर्वोच्च गणल्या जाणाऱ्या एनक्यूएएसचे जिल्ह्यातील आठ आरोग्य उपकेंद्रांना मानांकन मिळाले आहे. पारितोषिकापोटी तीन वर्षांत या उपकेंद्रांना एकूण ५१ लाख ८४ हजार मिळणार आहेत. राज्यात प्रथमच लातूरच्या आरोग्य उपकेंद्रांनी राष्ट्रीय मानांकनावर आपले नाव कोरले आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने राज्याबरोबरच देश पातळीवर गुणवत्तापूर्ण सेवेतून आपला ठसा उमटविला आहे. राष्ट्रीय पातळीवरील नॅशनल क्वालिटी ॲशुरन्स स्टॅण्डर्ड्स मार्फत गत महिन्यात जिल्ह्यातील आठ आयुष्मान आरोग्य मंदिरे, आरोग्यवर्धिनी केंद्रांचे (उपकेंद्र) मूल्यमापन करण्यात आले हाेते. त्यात गर्भधारणा आणि बाळंतपणात घ्यावयाची काळजी, नवजात आणि अर्भक आरोग्य सेवा, बालपण आणि किशाेरवयीन आरोग्य सेवा, कुटुंबकल्याण, संसर्गजन्य रोग, साधे आजार, असंसर्गजन्य रोगाचे व्यवस्थापन, सामान्य नेत्ररोग आणि कान, नाक, घसा यासाठी काळजी, मुख आरोग्य काळजी, आपत्कालीन वैद्यकीय सेवा अशा १२ सेवांचे मूल्यांकन झाले होते.

जिल्ह्यातील या उपकेंद्रांचा गौरव...जिल्ह्यातील किनी यल्लादेवी, तोंडचीर, तोंडार, अवलकोंडा (ता. उदगीर), पाखरसांगवी (ता. लातूर), काजळ हिप्परगा (ता. अहमदपूर), सारोळा (ता. औसा) आणि घोणसी (ता. जळकोट) या आठ आरोग्य उपकेंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन प्राप्त झाले आहे.

प्रत्येक उपकेंद्रास वर्षाला दोन लाख...मानांकनप्राप्त एका उपकेंद्रास वार्षिक २ लाख १६ हजार रुपयांचा निधी मिळणार आहे. ८ उपकेंद्रांना एकूण वर्षाला १७ लाख २८ हजार उपलब्ध होणार आहेत. ही रक्कम तीन वर्षे मिळणार आहे. त्यामुळे एकूण ५१ लाख ८४ हजारांचे पारितोषिक आहे.

लोकाभिमुख सेवेचा गौरव...जिल्ह्यात आरोग्य सेवांची व्याप्ती व गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. ग्रामीण भागातील आरोग्यवर्धिनी उपकेंद्रास एनक्यूएएसचे मानांकन मिळाल्यामुळे सेवा आणखी लोकाभिमुख होण्यास मदत होणार आहे. राज्यात पहिल्यांदाच आरोग्य उपकेंद्रास मानांकन मिळणे हा जिल्ह्याचा गौरव आहे.- वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हाधिकारी.

५० टक्के आरोग्य केंद्रांना मानांकन मिळविण्याचे ध्येय...एनक्यूएएसचे मानांकन हे सर्वोच्च आहे. ते प्राप्त करणे अत्यंत कठीण आहे. मात्र, आरोग्य विभागाने सेवा-सुविधेच्या माध्यमातून मिळविले आहे. येत्या एक-दीड वर्षात ५० टक्के आरोग्य केंद्रांना मानांकन मिळविण्याचे आमचे ध्येय आहे.- अनमोल सागर, सीईओ, जिल्हा परिषद.

आरोग्य सेवा आणखीन बळकट...आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांना राष्ट्रीय मानांकन मिळणे हा मोठा अभिमान आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळे मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे सर्वांचे मनोबल वाढणार आहे. त्यातून आरोग्य सेवा अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.- डॉ. एच.व्ही. वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

सहा महिन्यांत १८ आरोग्य संस्थांचा गौरव...सहा महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील १८ सार्वजनिक आरोग्य संस्थांचा एनक्यूएएस मानांकनाने गौरव झाला आहे. त्यात आठ प्राथमिक आरोग्य केंद्रे, मुरुडचे ग्रामीण रुग्णालय, लातुरातील स्त्री रुग्णालय आणि आता आठ आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांचा समावेश आहे.

टॅग्स :laturलातूरhospitalहॉस्पिटलLatur z pलातूर जिल्हा परिषद