शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
2
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
3
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
4
शरद पवार गटाला ७२ लाख मते पण १०च जागा जिंकले, अजितदादा गटाला ५८.१ लाख मते पण ४१ जागा जिंकले
5
प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
6
Blast in Delhi: राजधानी दिल्लीत मोठा स्फोट; तपास यंत्रणा अलर्ट मोडवर
7
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
8
सलग दुसऱ्यांदा शेअर देतेय 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट उद्या; ५० रुपयांपेक्षा कमी किंमत
9
खळबळजनक! गुजरातमध्ये सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांची मुद्दाम केली अँजिओप्लास्टी
10
सणासुदीच्या काळात Indian Railway मालामाल; तिकीट विक्रीतून कमावले 12 हजार कोटी!
11
IND vs AUS: वर्षभर 'फ्लॉप शो', मात्र ऑस्ट्रेलियात 'विराट' कमबॅक; गावसकरांनी सांगितलं शतकामागचं रहस्य
12
ऑस्ट्रेलियन PM अँथनी अल्बानीज यांनी घेतली टीम इडियाची भेट; किंग कोहलीसोबतचा संवाद चर्चेत (VIDEO)
13
BSNL ची आपल्या कोट्यवधी ग्राहकांना मोठी भेट; कंपनीने सुरू केली HD कॉलिंग सेवा...
14
पत्नीसोबत झालं भांडण, रागाच्या भरात पतीने घरच पेटवलं; व्हिडीओ व्हायरल
15
४० हजार कोटींची संपत्ती असणाऱ्या तरुणाने घेतला सन्यास! ऐशोआरामाच्या जीवनाचा का केला त्याग?
16
Maharashtra Politics : ज्यावेळी भाजपला मुख्यमंत्री निवडण्यासाठी ७२ तास लागले,तेव्हा धक्कातंत्र वापरले, नवीन चेहरे आले समोर
17
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून शिंदे बाहेर, फडणवीसवर सस्पेन्स कायम; BJP कसा घेणार निर्णय?
18
कोणीही मुख्यमंत्री झाले तरी...; देवेंद्र फडणवीस CM होण्याची शक्यता असतानाच मनोज जरांगेंचा इशारा
19
"बच्चू कडूंना महायुतीमध्ये घेण्याची आवश्यकता नाही, त्यांनी…", भाजपच्या वरिष्ठ नेत्याची स्पष्ट भूमिका
20
Gold Silver Price Today 28 November: तेजीनंतर सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; पाहा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे नवे दर

एटीएम फोडल्याप्रकरणी चौघांना दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 4:15 AM

उदगीर ग्रामीण पोलिसांनी सांगितले की, २३ जुलै २०२० रोजी शहर पोलीस ठाण्याचे अहमद पठाण व महेश मुसळे यांचे गस्त ...

उदगीर ग्रामीण पोलिसांनी सांगितले की, २३ जुलै २०२० रोजी शहर पोलीस ठाण्याचे अहमद पठाण व महेश मुसळे यांचे गस्त पथक नाईक चौकातून जात होते. तेव्हा तेथील स्टेट बँकेचे एटीएमची मशीन फोडत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आरोपीस रंगेहात पकडले. तेव्हा त्याचे तीन साथीदार पसार झाले. हा गुन्हा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्यामुळे त्याची ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या स्था.गु.शाचे नामदेव सारूळे, चंद्रकांत कलमे, तुळशीराम बरुरे, राहुल गायकवाड, दयाराम सूर्यवंशी यांनी तीन तासांत पळून गेलेल्या इतर तिघा आरोपींना बिदर रोडसमोरील पंपासमोरून ताब्यात घेतले होते.

याप्रकरणी गुरुबस खंकरे यांच्या फिर्यादीवरून मंगेश जाधव (रा. पाटोदा, ता. जळकोट), सिद्धार्थ ताटवाडे (रा. रेड्डी कॉलनी, उदगीर), दिगंबर डोंगरे (रा. समतानगर, उदगीर), सिकंदर शेख (रा. विकास नगर, उदगीर) यांच्याविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात २३ जुलै २०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास ग्रामीण ठाण्याचे सपोनि. अशोक घारगे यांनी वरील सर्व आरोपींविरुद्ध पुरावे जमा करून उदगीरच्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर.बी. राऊ यांनी चारही आरोपींना २ वर्षे ३ महिने कारावास व प्रत्येकी १२ हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे, अशी माहिती ग्रामीण पोलीस ठाण्याने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.