यावेळी नगरपंचायतीचे बांधकाम सभापती दत्ता सरवदे, पाणीपुरवठा सभापती उज्ज्वल कांबळे, ॲड. श्रीकांत सूर्यवंशी, धनंजय म्हेत्रे, भाजयुमोचे विपुल चेपट, शुभम लोखंडे, राहुल मोटेगावकर, सज्जू शेख, महेश वरवटे, शरद चक्रे, उमाकांत चक्रे, परमेश्वर मोटेगावकर, जयदीप बोडके, मक्सुद सय्यद, शौकत शेख, लक्ष्मण दळवी, राजकुमार जाधव, गौस सय्यद, संजू घडसे आदी उपस्थित होते.
सध्या कोरोनाची दुसरी लाट पसरली आहे. त्यामुळे रुग्ण संख्या वाढत आहे. आता तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. शहरातील कोरोनाच्या गंभीर रुग्णांना येथील ग्रामीण रुग्णालय, बावची येथील कोविड सेंटर अथवा लातूरला घेऊन जाण्यासाठी अनेकदा शासकीय रुग्णवाहिकेची प्रतीक्षा करावी लागते. शहरामध्ये एकही खासगी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे गैरसोय होत आहे. या समस्या जाणून घेऊन सामाजिक बांधीलकी जोपासत नगर पंचायतीचे विद्यमान उपनगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे यांनी शहरासाठी स्व. शामदादा आकनगिरे प्रतिष्ठानच्या वतीने एक रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे.
===Photopath===
160521\img-20210515-wa0025.jpg
===Caption===
रेणापूर येथील नागरिकांसाठी मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिले त्याचा लोकार्पण सोहळा वा करताना भाजपाचे तालुकाध्यक्ष अॅड. दशरथ सरवदे उपनगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे बांधकाम सभापती दत्ता सरवदे आदी उपस्थित होते