यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प प्रमुख कीर्ती किरण पुजार यांची प्रमुख उपस्थिती होती. नीट आणि जेईई परीक्षेचा अभ्यासक्रम त्याची व्याप्ती यासह विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेऊन अभ्यास करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले .
आरसीसीचे प्रा .राव , प्रा. साईकृष्णा, प्रा.मुकेश, प्रा. कुलकर्णी आणि किनवट चे इतर विषय शिक्षक मुख्याध्यापक कराड, नितीन जाधव, कावले, काळे यांची उपस्थिती होती. प्रारंभी आरसीसीच्या टीमचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सदरील उपक्रम राबविण्यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, आरसीसीचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर सहकार्य केल्याबद्दल किर्ती किरण पुजार यांनी आभार व्यक्त केले. सूत्रसंचालन मेथे यांनी केले. प्रास्ताविकात कुलदीप कुलकर्णी यांनी आरसीसी पॅटर्नची ओळख, २० वर्ष निकालातील सातत्याचे रहस्य सांगितले.
अभ्यासात सातत्य महत्वाचे...
प्रा.राव यांनी अभ्यास करण्याची योग्य वेळ, पध्दत सांगितली. प्रा. साईकृष्णा यांनी यशाची चतुःसूत्री मांडली. प्रा.मुकेश म्हणाले, इंग्रजीविषयी मनात न्यूनगंड बाळगू नये, अभ्यासात सातत्य ठेवल्यास यश नक्कीच मिळते. किर्ती किरण पुजार यांचा विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा, असे आवाहन केले.