तालुक्यातील अंबुलगा येथे आयोजित ३५ लाख रुपयांच्या विविध विकासकामांच्या उद्घाटन व लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील होते. यावेळी समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रशांत पाटील, माजी उपसभापती अशोक चिंते, तालुकाध्यक्ष शिवाजी बैनगिरे, पंचायत समितीचे उपसभापती सज्जनकुमार लोणाळे, जि. प. सदस्य हर्षवर्धन कसबे, श्रीमंत शेळके, सिद्धेश्वर पवार, अनिल चव्हाण, खुदबोद्दीन घोरवाडे, सरपंच सुंदर पाटील, दयानंद पाटील आदी उपस्थित होते. याप्रसंगी लक्ष्मण पाटील, दत्तराव रकटाटे, आबासाहेब पाटील, शिवाजी जाधव, गंगाधर जाधव, देविदास सूर्यवंशी, अंकुश शिंदे, बब्रुवान सूर्यवंशी, वाघंबर सूर्यवंशी, गणेश तेलंगे आदी उपस्थित होते.
यावेळी खा. शृंगारे म्हणाले, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लोकाभिमुख कामे करावीत. त्यासाठी लागणारा निधी आम्ही मिळवून देऊ. विकासकामांसाठी केंद्र सरकारचा विकास निधी ग्रामस्तरावर आणण्याचा आपला प्रयत्न असून, आगामी काळात तालुक्यातील विविध गावांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. आभार गणेश सूर्यवंशी यांनी मानले.