शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

स्मशानभूमी नसल्याने ग्रामपंचायतीसमोरच अंत्यसंस्कार, निलंगा तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 5:39 PM

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हणमंतवाडीमध्ये ही घटना घडली असून, ग्रामस्थांकडून गेल्या २० वर्षांपासून स्मशानभूमीची मागणी केली जात आहे.

निलंगा (लातूर) - १५ ते २० वर्षांपासून स्मशानभूमीला शासनाकडून जागा मिळत नसल्याने संतप्त नागरिकांनी मयत महिलेवर गावातील ग्रामपंचायतीसमोर अंत्यसंस्कार केल्याची घटना गुरुवारी निलंगा तालुक्यातील हणमंतवाडी अं.बु. येथे घडली आहे. तालुक्यातील हणमंतवाडी अ.बु. हे चार हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावात अद्यापही स्मशानभूमी नाही. त्यामुळे १५ ते २० वर्षांपासून गावातील नागरिक स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी प्रशासनाकडे करीत आहेत. मात्र, अद्यापि स्मशानभूमीचा प्रश्न संपुष्टात आला नाही. येथील जागेचा वाद न्यायप्रविष्ट असल्याने गावातील मयत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करायचे कोठे, असा प्रश्न निर्माण होत आहे.

गावातील सोजरबाई रामचंद्र निकम (७०) यांचे गुरुवारी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यामुळे नातेवाईक आणि नागरिकांनी गुरुवारी अंत्यविधीची तयारी सुरु केली. परंतु, अंत्यसंस्कार कोठे करावे, असा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा संतप्त नागरिकांनी गावातील ग्रामपंचायतीसमोर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेऊन तिथेच केले. गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात वादग्रस्त स्मशानभूमीच्या जागेत मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तेव्हा मयत रावण सूर्यवंशी यांच्यावर अंत्यसंस्कार कोठे करायचे, असा सवाल करीत नागरिकांनी तहसीलदारांकडे धाव घेतली होती. तेव्हा तहसीलदारांनी निलंग्यातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र, शेजारीच असलेल्या अंबुलगा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. गावात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास पोलीस, महसूल प्रशासनास बोलावूनच अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.स्मशानभूमीच्या जागेचा वाद न्यायालयात...

सार्वजनिक स्मशानभूमीसाठी चार गुंठे जागा गावाने खरेदी केली होती. परंतु, संबंधित शेत मालकाने ती जागा गावातील एकास विक्री केली. विक्री करणारा आणि खरेदी करणारा हे दोघेही जागा देण्यास तयार नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी न्यायालयात धाव घेतली आहे. प्रशासन यासंदर्भात कुठलाही पाठपुरावा करीत नसल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.

जिल्हाधिका-यांनी दखल घ्यावी...

गावात स्मशानभूमी तयार करण्यासाठी ग्रामपंचायतीने वारंवार पाठपुरावा केला. मात्र, शासन अंत्यविधीसाठी जागा देत नाही. जिल्हाधिका-यांनी तात्काळ लक्ष देऊन जागा उपलब्ध करून द्यावी, अन्यथा आम्ही ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत, असे ग्रामस्थ धर्मराज लखने म्हणाले.

प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर अंत्यसंस्कार...गावात एखाद्याचा मृत्यू झाला की, पोलीस, महसूल प्रशासनास बोलावून मध्यस्थी करून अंत्यसंस्कार करावे लागतात. मात्र आता संबंधित शेतकरी शेतात अंत्यसंस्कार करू देत नाही. त्यामुळे तात्काळ स्मशानभूमीचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी सरपंच प्रभाकर मलिले यांनी केली.

अंबुलगा तलावानजीक जागा उपलब्ध...

गावाशेजारील २० गुंठे जमीन सार्वजनिक स्मशानभूमीसाठी १९८५ साली अधिग्रहित करण्यात आली होती. परंतु, त्या जमिनीची खरेदी- विक्री करण्यात आली आहे. दरम्यान, खरेदीदाराने न्यायालयातून मनाई हुकुम आणले आहे. ग्रामसेवक, तलाठ्यांनी गावाशेजारील अंबुलगा तलावाजवळ अंत्यविधी करण्यास जागा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, काही नागरिकांनी ग्रामपंचायतीसमोर अंत्यविधी करून अतिरेक केला आहे, असे तहसीलदार गणेश जाधव म्हणाले.

टॅग्स :laturलातूरfundsनिधी