लातूर : तालुक्यातील भडी येथे चोरट्याने घर फोडून रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने असा जवळपास पाच लाखाचा मुद्देमाल लंपास केला असून, ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. याबाबत लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी गाेपाळ किशन मद्दे (वय ५९ रा. भडी, ता. जि. लातूर) या घराचे मेन गेटचे कुलूपासह लाेखंडी पट्टी ताेडून चाेरट्यांनी घरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास प्रवेश केला. दरम्यान, किचनरुमच्या दाराचे कुलूप ताेडून चाेरटे आत घुसले. कपाटाचे दार वाकडे करुन, लाॅकरचे लाॅक ताेडून साेन्याचे दागिने आणि राेख रक्कम असा जवळपास ४ लाख ८९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केले. चाेरट्यांनी जाताना किचनरुमचे ताेडलेले कुलूपही साेबत नेले. तर चाेरट्यांनी पळविलेल्या मुद्देमालामध्ये चार ताेळ्याचे पट्टीचे लांब गंठण, एक ताेळ्याची गाेल मन्याची बाेरमाळ, एक महाराजा, एक पिळ्याचीअंगठी, पाच ग्रॅमचे गळ्यातील कड्याचे लाॅकेट, सात ग्रॅमचे झुमके, साेन्याचे चार ग्रॅमचे मनी-मंगळसूत्र, राेख तीन लाखाचा समावेश आहे.
याबाबत लातूर ग्रामीण पाेलीस ठाण्यात अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पाेलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत. घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली आहे. लातूर शहरासह जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये मोटारसायकल चोरी, घरफोडीच्या घटनांत अलीकडे मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. चोरट्याचा टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. सणासुदीच्या दिवसात घर फोडण्याचा फंडा चोरट्यांनी सुरु केला आहे.
तर मी चाेरट्यांना ओळखताे...
तर मी चाेरट्यांना पाहिल्यास ओळखताे, असा जबाब तक्रारदार गाेपाळ किशन मद्दे यांनी पाेलिसांना दिला आहे. घरातील व्यक्ती ज्या-ज्या खाेलीत झाेपले हाेते. त्या-त्या खाेल्यांना चाेरट्यांनी बाहेरुन कडी लावली हाेती. अतिशय शिताफिने चाेरट्यांनी हे घर फाेडल्याचे समाेर आले आहे.