बाळु बुद्धे लातूर : एमआयडीसीसह विविध विकास कामांसाठी संपादित केलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला मिळालेल्या हरंगुळ परिसरातीलजवळपास ४०० शेतकऱ्यांना प्राप्तीकर विभागाने १५ लाखांपासून दीड कोटी रुपयांपर्यंत कर भरण्याच्या नोटीसा पाठविल्या आहेत. मार्चअखेरपर्यंत प्राप्तीकर भरण्याचे निर्देश त्यात देण्यात आले आहेत. या नोटीसांमुळे शेतकºयांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. लातूरजवळील हरंगुळ (बु.), चिंचोलीराव वाडी, खंडापूर शिवारातील ४०० शेतकºयांची जवळपास दोन हजार एकर शेतीऔद्योगिक वसाहतीसाठी शासनाने संपादित केली होती. ७ रुपयांपासून १५ रुपये फूट दराने शेतकºयांना पैसे देण्यात आले. मात्र हा मोबदला अल्प असल्याने शेतकºयांनी न्यायालयात धाव घेतली व वाढीव मोबदला मिळविला. मोबदला मिळण्याची प्रक्रिया सुरू असतानाच प्राप्तीकर विभागाने ४०० शेतकºयांना कर भरण्याच्या नोटिसा पाठविल्या आहेत. प्रत्येक शेतकºयाला १५ लाखांपासून दीड कोटीपर्यंत प्राप्तीकर भरायला सांगितले आहे. काही शेतकºयांना संपादित केलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला मिळाला आहे, तर काहींचा प्रलंबित आहे. त्यातच या नोटिसा मिळाल्या आहेत.>वाढीव मोबदल्यावर प्राप्तीकरहरंगुळ (बु.) शिवारातील ५८३ हेक्टर, चिंचोलीराव वाडी येथील १८० आणि खंडापूर शिवारातील ३६५ हेक्टर जमीन एमआयडीसीसाठी संपादित केली आहे. त्यांच्या वाढीव मोबदल्यावर प्राप्तीकर विभागाच्या नोटिसा आल्या आहेत.
दीड कोटींपर्यंत प्राप्तीकर भरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 6:10 AM