लातूर : जिल्हा पाेलीस दलात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पाेलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले गजानन भातलवंडे यांना राष्ट्रपतीपदक सन्मान जाहीर झाला आहे.
पाेलीस दलात दक्षपणे सेवा बजावणारे पाेलीस निरीक्षक गजानन लक्ष्मीकांत भातलवंडे यांना साहित्याचीही आवड आहे. त्यांची पाेलीस दलात २८ वर्षे सेवा झाली आहे. सध्याला ते स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात कार्यरत आहेत. त्यांना आजपर्यंतच्या सेवेबद्दल विशेष सेवापदक, अंतरिक सुरक्षापदक, पाेलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह पुरस्कार मिळाले आहे.
२८ वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी अनेक संवेदनशील गुन्ह्यांची उकल केली आहे. शिवाय, गुन्ह्यांचा तपास, दाेषसिद्धीसाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जवळपास ५३ प्रशंसापत्र आणि ४१० अवाॅर्ड मिळाली आहेत. १९९३ मध्ये ते पाेलीस उपनिरीक्षक म्हणून पाेलीस सेवेत दाखल झाले आहेत. त्यांनी यापूर्वी विदर्भातील भंडारा, गाेदिया जिल्ह्यांत काम केले आहे, तर मराठवाड्यातील नांदेड, बीड, परभणी आणि बाभळगाव येथील पाेलीस प्रशिक्षण केंद्रातही सेवा बजावली आहे.
त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पाेलीस अधीक्षक अनुराग जैन, सहायक पाेलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, सहकारी पाेलीस अधिकारी आणि मित्र परिवाराच्या वतीने काैतुक करण्यात आले.