शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

लातूरमध्ये टीबीमुक्त ४४ ग्रामपंचायतींचा गौरव

By हरी मोकाशे | Published: July 10, 2024 6:52 PM

जि.प.चे सीईओ सागर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला

लातूर : जिल्ह्यातील ४४ ग्रामपंचायतींनी टीबीमुक्तीचे निकष पूर्ण करीत टीबीमुक्त झाल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या हस्ते बुधवारी गौरव करण्यात आला.

यावेळी पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी. गिरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे, कुष्ठरोग विभागाच्या सहाय्यक संचालक डॉ. व्ही.जी. गुरुडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.एस. बरुरे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. एस.एस. हिंडोळे, प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.व्ही. जाधव, डॉ. गिरीजा ठाकूर, सम्यक खैरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस.एन. तांबारे आदींची उपस्थिती होती.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे म्हणाले, जिल्ह्यातील अधिकाधिक ग्रामपंचायतींनी क्षयरोगमुक्त होण्यासाठी प्रयत्न करावा. त्यामुळे क्षयरोगाचे लवकरात लवकर उच्चाटन होण्यास मदत होईल. प्रास्ताविक डाॅ. एस. एन. तांबारे यांनी, सूत्रसंचालन डॉ. एस.एन. बनशेळकीकर यांनी केले. आभार डॉ. एच.के. राऊत यांनी मानले.

सामुहिक प्रयत्नांमुळे यश...मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर म्हणाले, क्षयमुक्त ग्रामपंचायती निर्माण करण्यासाठी गाव पातळीवरील आशा स्वयंसेवका, सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, समुदाय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, क्षयरोग विभागाचे कर्मचारी, शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे प्रयत्न केले. त्यामुळे पहिल्या टप्प्यात ४४ ग्रामपंचायती टीमुक्त झाल्या आहेत. उर्वरित ग्रामपंचायतींनीही क्षयरोगमुक्तीसाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी आवश्यक ती मदत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात येईल.

या ग्रामपंचायतींचा सन्मान...देऊळवाडी, धडकनाळ, लिंबगाव, मादलापूर, मांजरी, चिगळी, करडखेल, उमरगा मन्ना, सोनावळा, पाटोदा बु., केकतसिंदगी, ढोरसांगवी, वडगाव, होकर्णा, उमदरा, माळहिप्परगा, बोळेगाव, आरी, करेवाडी, हालकी, वांजरखेडा, कांबळगा, धनेगाव, वडमुरंबी, बोंबळी खु., अंबानगर, सावरगाव, कामखेडा, नरवटवाडी, पळशी, भोकरंबा, आनंदवाडी, कासारशिरसी, नेलवाड, लांबोटा, राठोडा, भातांगळी, चिंचोलीराव, तांदुळजा, जानवळ, लातूररोड, चिंचोली जोगन या ४४ ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात आला.

टॅग्स :laturलातूरLatur z pलातूर जिल्हा परिषद