चाकूर तालुक्यातील आष्टा येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बाेलत हाेते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. श्रीराम गायकवाड, तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, घरणीचे सरपंच भानुदासराव पोटे, माधवराव जाधव, बालाजी सूर्यवंशी, दयानंद सुरवसे, किशनराव बुड्डे पाटील, नाना शिंदे, अनिलराव वाडकर, मनोज उळागड्डे यांची उपस्थिती हाेती. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामांचा दर्जा हा उत्तम असला पाहिजे. केवळ कामातून स्वार्थ साधण्यासाठी कामे करू नका, असेही आमदार पाटील म्हणाले. यावेळी मूलभूत योजनाअंतर्गत दहा लाखांचा सिमेंट रस्ता, तीन लाखांचे आरओ प्लांट, दलितवस्तीमध्ये आठ लाख रुपयांचा रस्ता, पशू वैद्यकीय दवाखान्यासाठी ३१ लाख रुपये, पाईपलाईनसाठी २१ लाख, सेवापूर तांडा सांस्कृतिक सभागृहासाठी सात लाख रुपये, सेवापूरतांडा येथील सिमेंट रस्त्यासाठी पाच लाख रुपये असे एकूण ८५ लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन आणि लाेकार्पण साेहळा आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाला.
यावेळी लालासाहेब शिंदे, गणेश सिंदाळकर, अभियंता फड, रामदास घुमे, सचिन तोरे, नागेश बेरुळे, व्यंकटराव पाटील, राजेंद्र माचवे, शेषराव शिंदे, धनाजी पवार, सावता माळी, धनेश्वर पाटील, सुभाष मुळे, संजय चव्हाण, माधवराव महाराज, ज्ञानोबा महाराज, कल्याण पाटील, ज्ञानोबा शेळके, किशनराव पाटील, प्रल्हाद निटुरे, एकनाथ पवार, मुरहरी गायकवाड यांच्यासह कार्यकर्त्यांची माेठी उपस्थिती हाेती.