Grampanchayat Result: देवणी तालुक्यात प्रस्थापितांना धक्का; मतदार कॉंग्रसच्या बाजूने
By संदीप शिंदे | Published: December 20, 2022 05:40 PM2022-12-20T17:40:09+5:302022-12-20T17:40:43+5:30
गुलालाची उधळण करीत समर्थकांचा आनंदोत्सव
देवणी (लातूर) : तालुक्यातील ८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या निकालानंतर बहुतांश ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसला, तर मतदारांनी काँग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला.
गावनिहाय विजयी सरपंच व सदस्य...
टाकळी (व.) : सरपंच अंजनाबाई ज्ञानोबा बिबिनवरे, सदस्य- गणपत बिरादार, उषाताई मारोती सूर्यवंशी, कविता माधव कोरे, विनायकराव पाटील, अनिता व्यंकट लोहार, सुमनबाई माधव गुडसुरे, शंकर गोविंद पाटील, व्यंकटराव बिरादार, दैवता ज्ञानोबा सूर्यवंशी हे विजयी झाले.
हेळंब- सरपंच- अयोध्या दिलीप शिरसे, सदस्य- उद्धव मोरे, रणजित सावंत, तस्लीमबी सरदार मुल्ला, माधव बिजापुरे, स्वाती नागनाथ सूर्यवंशी, शिवा शिंदे, सोपान शिरसे, संगीता सुनील महानुरे, रुक्मीणबाई पंढरी सावंत.
बोंबळी खु. : सरपंच- राजाराम भोसले, सदस्य : संतोष भोसले, मंगलताई नरसिंग कांबळे, कोमल बालाजी भोसले, नरसिंग भोसले, लक्ष्मीबाई बालाजी सगर, शोभा विलास भोसले हे सहा जण विजयी झाले. बोंबळी बु. येथील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याने दोन उमेदवार निवडणूक प्रक्रियेतून बाद झाले.
वडमुरंबी- सरपंच- गंगाबाई मधुकर मोरे, सदस्य : राजेंद्र येडुले, संतोष बिरादार, गोजरबाई माधव मोरे, धनराज बिरादार, योगेश्वरी नितीन कांबळे, जयश्री विश्वनाथ पाटील, ज्ञानोबा भिंगे, मीराबाई नरसिंग पवार, गंगूबाई संजीव सूर्यवंशी.
सय्यदपूर- सरपंच- सतीश कासले, सदस्य- उमेश पाटील, ज्योती भीमराव कांबळे, सुननीता लक्ष्मण चिटुपे, विक्रम माकणे, तेजाबाई किशन कांबळे, शिवा जळकोटे, अर्जुन हणमंते, अच्युत जळकोटे, जनाबाई तानाजी बिरादार.
हिसामनगर- सरपंच- सपना विजय मुर्क, सदस्य- बाळासाहेब डिगोळे, सुमनबाई शेषेराव वाघमारे, कलावती सदाशिव पाटील, सखाराम गायकवाड, सुनीलप्रसाद दुबे, शोभा सन्मुख स्वामी, बब्रूवान डिगोळे, कालिदास कांबळे, सुरेखा मारोती बेंजरगे.
दवणहिप्परगा- सरपंच- सतीश नामदेव पाटे, सदस्य- आकाश पाटील, रंजना नागनाथ इस्लामपुरे, अलका शिवराज पाटील, अंकिता अनिल पाटील, महादेव पाटील, लक्ष्मीबाई रमेश कांबळे, संजय कांबळे, इंदुमती शिवाजी टिळे, सुधाकर कारभारी, संतोष सगर.
बोरोळ- सरपंच- प्रमोद ऊर्फ कृष्णा पाटील, सदस्य- अनिल बिरादार, उषा प्रताप कोरले, गोविंद सूर्यवंशी, अयोध्या धनाजी धनाडे, पंढरी खुळे, फुलूबाई नरसिंग गायकवाड, युवराज देवणे, संगीता दयानंद चाफे, सुनीता गोविंद बिरादार, सुनीता बाबूराव बालुरे विजयी झाले आहेत.
मतमोजणी शांततेत पार पडावी म्हणून तहसीलदार सुरेश घोळवे, नायब तहसीलदार विलास तरंगे यांच्यासह महसूल व इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी पोलिस निरीक्षक गणेश सोंडारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला.