यावेळी उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, कृषी व पशुसंवर्धन सभापती गोविंद चिलकुरे, जि.प. सदस्य डॉ. संतोष वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी रत्नराज जवळगेकर, कार्यकारी अभियंता श्रीनिवास गंगथडे आदी उपस्थित होते.
समाजकल्याण विभागाच्या वतीने सन २०२०-२१ मध्ये आंतरजातीय विवाह केलेल्या पात्र जोडप्यांना अनुदान धनादेश देण्यात येऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक समाजकल्याण सभापती राेहिदास वाघमारे यांनी केले. सूत्रसंचालन तुकाराम कोरे यांनी केले. आभार शाहुराज कांबळे यांनी मानले.
आंतरजातीय विवाह काळाची गरज...
जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे म्हणाले, समाजात जातीय सलोखा निर्माण होण्यासाठी आंतरजातीय विवाह ही काळाची गरज आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने चालू आर्थिक वर्षात अशा ८० लाभार्थ्यांना अनुदान वितरित केेले आहे.